Breaking

Tuesday, March 22, 2022

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून जहरी टीका; म्हणाले... https://ift.tt/iBKv35b

औरंगाबाद: एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार (imtiaz jaleel) यांनी राष्ट्रवादीला युती करण्याचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच या प्रस्तावानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून जलील यांच्यावर टीका सुद्धा केली जात आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी, इम्तियाज जलील हे तोडीपाणी बादशहा असल्याची खोचक टीका केली आहे. कदीर मौलाना हे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. ( criticizes ) क्लिक करा आणि वाचा- यावेळी बोलताना कदीर मौलाना म्हणाले की, इम्तियाज जलील तोडीपाणी नेता असून, आम्ही त्यांचे नाव तोडीपाणी बादशहा ठेवले आहे. जलील अधिकाऱ्याचे तोडीपाणी बादशहा, कंत्राटदारांचे तोडीपाणी बादशहा असून, त्यांचे अनेक प्रकरणे आम्ही समोर आणणार आहे. त्यामुळे जर आमचा पक्ष अशा लोकांसोबत हातमिळवणी करत असेल तर आम्हाला विचार करावे लागेल असा इशारा कदीर मौलाना यांनी पक्षाला दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- तर पुढे बोलताना कदीर मौलाना म्हणाले की, जलील यांच्या आईच्या निधनाला दहा दिवस पूर्ण झाले नव्हते,पण कुणी सांत्वनासाठी आले असता त्यावेळी सुद्धा राजकीय प्लानिंग केली जाते हे खुपचं दुर्दीवी आहे. मुळात जलील यांच्या पायाखालची जमीन सरकली असून,महानगरपालिका निवडणुका लागल्यावर आपल्या हातात काहीच येणार नसल्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खांद्यावर हात ठेवून पुढील काही दिवस काढण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याची टीकाही कदीर मौलाना यांनी यावेळी केली. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Tptki3G

No comments:

Post a Comment