Breaking

Sunday, March 20, 2022

'आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, पण प्रत्यक्ष लाभ घेते पवार सरकार'; कीर्तीकरांचे खळबळजनक वक्तव्य https://ift.tt/n8yXD4B

रत्नागिरी: निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेला अतिशय कमी निधी मिळाल्याचे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निधी वाटपावरून शिवसेनेला चिमटा काढला होता. त्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळत फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, शिवसेनेचे खासदार यांच्या वक्तव्याने फडणवीस यांच्या वक्तव्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळाला असून त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कीर्तीकर यांनी महाविकास आघाडीला एक प्रकारे घरचा अहेरच दिला असून आघाडीत सारे काही अलबेल नाही हे स्पष्ट होत असल्याची चर्चा रत्नागिरीत ऐकायला मिळत आहे. (shiv sena mp criticizes ncp calling it pawar sarkar regarding allocation of fund) क्लिक करा आणि वाचा- रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राह्मणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना कीर्तीकर म्हणाले की, विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळत आहे. आम्हाला मात्र मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईमध्ये नागरोत्थान आणि नगरविकास विभागाचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो ही. मात्र, निधीची पळवापळवी केली जात आहे, असे सांगतानाच आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते, अशा शब्दात कीर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टोला हाणला आहे. क्लिक करा आणि वाचा- या वेळी बोलताना कीर्तीकर यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत भेदांवर बोट ठेवले. आघाडीत अंतर्गत भेद खूप आहेत आणि त्याचा त्रास होतो असे कीर्तीकर म्हणाले. हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही. मात्र, इकडे अधिक आहे. हा त्रास आमदार योगेश कदम यांना भोगायला लागत असल्याचे सांगत मी आपल्या पाठीशी आहोत असे आमदार योगेश कदम यांना सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fkz4pUH

No comments:

Post a Comment