Breaking

Sunday, March 20, 2022

राजापूर: शिमगोत्सवात दोन गटात वाद; डोंगर गावात जमावबंदी आदेश जारी https://ift.tt/OG6yWb9

रत्नागिरी: कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या आनंदात सुरवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण जवळपास १५ दिवस असतो. या सणाला रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यात डोंगर येथे शिमगोत्सवात पालखी नेण्यावरून दोन गटात वाद झाला. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून राजापूर पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल सुमारे ४१ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली होती. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उभय गटातील संशयितांना शनिवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तहसीलदार सौ. शितल जाधव यांनी १४४ कलमान्वये गावात आदेश लागू केले आहेत. (in the mountain village of ratnagiri after a dispute between two groups during the a was imposed in the village) या आदेशान्वये मौजे डोंगर गावातील होळीचा मांड, श्री निनादेवी, डोंगरादेवी, ब्राम्हणदेव ही मंदिरे व त्या मंदिराचे १०० मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चालू शिमगोत्सवामध्ये दि. १९ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजता ते दि. ०२ एप्रिल २०२२ रोजी रात्रौ ९ वाजेपर्यंत (फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे) पार्टी क्र. १ व त्यांचे हितसंबधित तसेच पार्टी क्र. २ व त्यांचे हितसंबधित यांना जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या बाबतच्या नोटीसा उभय गटांना बजावण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- डोंगर येथे शिमगोत्सवावरून गेले काही वर्षे वाद सुरू आहे. त्याबाबत न्यायालयात अधिकारांबाबत न्यायालयात दावा दाखल झालेला आहे. या पार्श्वभुमीवर राजापूर तहसीलदारांनी यावर्षी डोंगर येथील पार्टी क्र. २ म्हणजे गुरव गटाने रिवाजाप्रमाणे साजरा करावा. पार्टी क्र. २ यांनी पार्टी क्र. १ शेलार गट व ग्रामस्थांना या सणामध्ये सामील करून घ्यावे, देवस्थानचे दास्तान, मुखवटे शिमगोत्सव साजरा करण्याच्या कामी पार्टी क्र. २ यांचेकडे देण्यात यावेत असे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत वाद निर्माण होवून त्यातून हाणामारी होऊन राजापूर पोलिसांनी उभय गटातील सुमारे ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रारंभी दिलेल्या आदेशाचे पालन उभय गटांकडून न झाल्याने वाद निर्माण झाल्याने आता नव्याने बंदी आदेश जारी करत शिमगोत्सव साजरा करण्यावर प्रतिबंध केला तर गावात १४४ कलमान्वये बंदी आदेश जारी केला आहे. क्लिक करा आणि वाचा- तहसीलदार सौ. जाधव यांनी पार्टी क्र. २ ला उत्सव साजरा करण्याची परवानगी देताना रिती रिवाज व प्रत्यक्ष कामकाज कशा पध्दतीने करावे याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले नसल्याने उभय गटात पालखी नेण्यावरून वाद निर्माण झाल्याचे शेलार गटाचे म्हणणे आहे. राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगर गावात शिमगोत्सवातील मानपानावरून दोन गटात मागील काही वर्षांपासून वाद आहेत. शुकवारी शिमगोत्सवानिमित्त दोन्ही गट ग्रामदेवतेच्या मंदिरात एकत्र जमले होते. यावेळी पालखी नेण्यावरून दोन्ही गटात वाद निर्माण झाला. या वादातून दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. यानंतर परस्परविरोधात दोन्ही गटाकडून राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी परस्पर झालेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी दोन्ही गटातील ४१ जणांवरून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी संशयितांवर भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fZvVqEI

No comments:

Post a Comment