Breaking

Sunday, March 20, 2022

राजर्षी शाहू महाराजांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी; पालकमंत्री सतेज पाटील यांची मोठी घोषणा https://ift.tt/pBCkx1o

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष '' म्हणून साजरे करण्यात येणार असून स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणाार आहे. या निमित्ताने रथोत्सव, पोवाडा, संगीत, मर्दानी खेळ, चित्ररथ, व्याख्याने, प्रदर्शन, असे व इतर विविध उपक्रम राज्यभर आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाईल. क्लिक करा आणि वाचा- याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व वर्षभर साजरे करण्यात येणार आहे. या पर्वात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उपक्रमात नवीन कार्यक्रम राबविण्यात मान्यवर व जनतेकडून आलेल्या नवीन सूचनांचा स्वीकार केला जाईल. राज्यात छत्रपती शाहू महाराजांनी ज्या-ज्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत अशा ठिकाणीही कार्यक्रम राबविण्यात येतील. यातील काही कार्यक्रम सांस्कृतिक विभागाकडे दिले जातील. शाहू मिल व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्मृती- शताब्दी पर्वातील काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री म्हणाले, शाहू मिल स्मृती स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारा जगातील एकमेव राजा, पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. स्मृती-शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना देऊन हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येईल. क्लिक करा आणि वाचा- खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात राज्यातील नामवंत शेतकऱ्यांसाठी ॲग्रीकल्चर कार्यशाळा घेण्यात यावी. दिल्लीतही कार्यक्रम व्हावा, शाहू महारांजानी भेट दिलेल्या ठिकाणी कार्यक्रम व्हावेत, कोल्हापूरला जागतिक स्तरावर पोहचवावे, शाहू मिल काम आणि शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचे संरक्षण, शाहू चरित्रग्रंथ अभ्यासक्रमात समावेश, खासबाग मैदावार महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी स्पर्धाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्व लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत विविध उपक्रम राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोक सहभागातून लोकराजा 'शाहू कृतज्ञता पर्व' आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने १८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी दिनी (६ मे रोजी) लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूरची जनतेकडून आदरांजली वाहण्यात येईल. क्लिक करा आणि वाचा- राज्यभरात विविध उपक्रम या 'कृतज्ञता पर्व' दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. पोवाडा, संगीत, मर्दानी खेळ, चित्ररथ, व्याख्याने, प्रदर्शन, असे व इतर विविध उपक्रम राज्यभर आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाईल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SRnjLUv

No comments:

Post a Comment