Breaking

Thursday, March 31, 2022

पोलिसांच्या धावत्या गाडीतून उडी घेत कैद्याने काढला पळ; पण... https://ift.tt/oiRXqEW

धुळे: जिल्हा कारागृहातून भुसावळात नेत असतांना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील जैन इरीगेशन कंपनीजवळ महामार्गाावर पोलिसांच्या हाताला झटका देवून पोलिसांच्या धावत्या गाडीतून उडी घेत पसार झाला होता. घटनेने खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या २४ तासाच्या आत गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेने फरार झालेल्या कैद्याच्या मुसक्या आवळल्या. राजू विक्रम कांडेलकर (वय-२०, रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर) असे फरार अटकेतील कैद्याचे नाव आहे. (the jumped out of the and fled in dhule) क्लिक करा आणि वाचा- भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात येवून संशयित राजू कांडेलकर याला धुळे जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान या गुन्ह्यात कांडेलकर याला ट्रान्सफर वॉरंट घेवून भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रशिद तडवी, पोलीस नाईक जाकीर मंसूरी व पोलीस नाईक विकास बाविस्कर हे बुधवार ३० मार्च रोजी भुसावळकडे येत होते. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील जैन इरीगेशन कंपनी आल्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका मारत संशयित कांडेलकर याने चालत्या वाहनातून उडी टाकून पळ काढला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. क्लिक करा आणि वाचा- फरार संशयित कांडेलकर हा रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार वसंत लिंगायत, पोहेकॉ दिपक पाटील, पोना किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील यांच्या पथकाने गुरुवारी राजू कांडेलकर याला तांदलवाडी येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8LrbUF0

No comments:

Post a Comment