Breaking

Sunday, March 27, 2022

मोहम्मह सिराजच्या एकाच षटकात आरसीबीने सामना गमावला, किंग ठरत पंजाबने केली विजयाची बोहनी... https://ift.tt/pXIjiLA

नवी मुंबई : फक्त एका षटकात सामना कसा बदलू शकतो, हे आजच्या आरसीबी आणि पंजाबच्या सामन्यात पाहायला मिळाले. हा सामना आरसीबीचा संघ जिंकेल, असे वाटत होते. पण पंजाबने मोहम्मद सिराजच्या १८व्या षटकात तब्बल २५ धावांची लूट केली आणि आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला. फॅफच्या या तुफानी फलंदाजीमुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाकडून कर्णधार मयांक अगरवाल आणि शिखर धवन यांनी ७१ धावांची दमदार सलामी दिली. त्यावेळी हा सामना पंजाबचा संघ जिंकेल, असे वाटत होते. पण मयांक बाद झाला आणि त्यानंतर काही वेळातच शिखर धवनही बाद झाला. त्यामुळे पंजाबच्या हातून सामना निसटला, असे वाटत होते. पण ओडेन स्मिथ आणि शाहरुख खान यांनी अखेरच्या षटकांमधेय दमदार फलंदाजी करत संघाला पाच विकेट्स राखत सामना जिंकून दिला. कर्णधार कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ फॅफ ड्यु प्लेसिसने दाखवून दिला.आरसीबीचे नेतृत्व सांभाळल्यावर फॅफ सलामीला आला आणि धडाकेबाज फटकेबाजी करत त्याने ८८ धावांची वादळी खेळी साकारली. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. कारण आरीसबीने मोठी धावसंख्या उभारली असली तरी त्यांना या आव्हानाचा बचाव करता आला नाही. मयांक आणि धवन यांनी पजाबला धडाक्यात सुरुवात करून दिली. या दोघांनी १०च्या सरासरीने फटकेबाजी करत ७ षटकांत ७१ धावा फटकावल्या. पण हसरंगाने यावेळी मयांकला बाद केले आणि पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकने यावेळी ३२ धावा केल्या, त्यानंतर धवन आणि भानुका यांनी प्रत्येकी ४३ धावा केल्या. पण हे दोघेही बाद झाले आणि पंजाबचा संघ अडचणीत सापडला. पण त्यानंतर ओडेन स्मिथने आठ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद २५ धावांची वादळी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्मिथला यावेळी शाहरुख खानने नाबाद २४ धावा करत चांगली साथ दिली. तत्पूर्वी, फॅफने अनुज रावतबरोबर ५० धावांची सलामी दिली. अनुज २१ धावांवर बाद झाला आणि विराट कोहली फलंदजीला आला. पण विराटपेक्षा यावेळी धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली ती फॅफची. कारण फॅफने स्थिरस्थावर झाल्यावर मागे वळून पाहिलेच नाही. फॅफने त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. चौकारांपेक्षा षटकार खेचण्यावर फॅफने यावेळी भर दिला आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यावर तर फॅफने पंजाबच्या गोलंदाजीची पिसे काढली आणि दणकेबाज फलंदाजीचा उत्तम नमुना त्याने यावेळी पेश केला. दुसऱ्या टोकाकडून विराटही चांगली फलंदाजी करत होता. पण फॅफच्या फटकेबाजीपुढे विराटची फटकेबाजी ही जास्त प्रभावी दिसत नव्हती. फॅफ आता या आयपीएलमधले पहिले शतक साकारणार, असे दिसत होते. पण पंजाबचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने फॅफला यावेळी बाद केले. फॅफने यावेळी ५७ चेंडूंत तीन चौकार आणि सात चौकारांच्या जोरावर ८८ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. फॅफच्या या खेळीपुढे विराट कोहलीची फलंदाजी मात्र झाकोळली गेली. फॅफच्या या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीला पंजाब किंग्सपुढे २०६ धावांचे मोठेआव्हान ठेवता आले. कोहलीने यावेळी २९ चेंडूंत नाबाद ४१ धावा केल्या तर दिनेश कार्तिकने फक्त १४ चेंडूंत नाबाद ३२ धावांची खेळी साकारली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/b7IMFDN

No comments:

Post a Comment