Breaking

Tuesday, March 22, 2022

विधानसभेच्या आखाड्यात दोन पाटलांची झुंज; चंद्रकांत पाटील-सतेज पाटीलच आमने सामने https://ift.tt/rhOsLpK

गुरुबाळ माळी, कोल्हापूर कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी लढाई रंगत असताना ही लढत दोन उमेदवारांपेक्षा दोन नेत्यांत झुंपण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात दुरंगी लढत होत असली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामुळे उमेदवार कुणीही असो, लढाई मात्र दोन पाटलांमध्ये होणार हे निश्चित आहे. (no matter who the candidate is there is a battle of prestige between and satesh patil for the kolhapur north assembly by election) आमदार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने त्यांच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ही जागा काँग्रेसला दिली आहे. त्यानुसार या पक्षाने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली आहे. शहरात शिवसेनेचा प्रभाव आहे. यामुळे मैत्रीपूर्ण लढतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रयत्न केला. पण, काँग्रेसला पाठिंबा द्या असा आदेशच मातोश्री वरून आल्याने त्यांचे बंड शमले आहे. दुसरीकडे भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी देत आरपारची लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत. क्लिक करा आणि वाचा- ही लढाई कदम आणि जाधव यांच्यात दिसत असली तरी खरी पडद्यामागची लढाई दोन पाटलांमध्येच आहे. लोकसभा निवडणुकीपासून पालकमंत्री पाटील यांचा वारू अतिशय जोरात आहे. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, गोकुळ, जिल्हा बँक असे एकापाठोपाठ एक किल्ला ताब्यात घेत त्यांनी जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. ते काँग्रेचे नेते तर आहेत, शिवाय जिल्हाध्यक्षही आहेत. त्यामुळे काँग्रेसची जागा कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यादृष्टीनेच त्यांनी या निवडणुकीची सारी यंत्रणा ताब्यात घेतली आहे. ‘मीच उमेदवार आहे, असे गृहित धरून काम करा’ असा आदेशच त्यांनी त्यांच्या समर्थकांना दिला आहे. यावरून त्यांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे याचा अंदाज येतो. क्लिक करा आणि वाचा- दुसऱ्या बाजूने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध केल्याने आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा न मिळाल्याने पक्षाचे जिल्ह्यातील पाटी कोरी आहे. प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात ही अवस्था त्यांनाच त्रासदायक ठरत आहे. यामुळे काहीही करून त्यांना भाजपचे खाते उघडायचे आहे. यासाठी कदमांना निवडून आणण्यासाठी त्यांनी राज्यातील सारी भाजपची ताकद लावण्याचा इरादाच स्पष्ट केला आहे. अतिशय सुक्ष्म नियोजन करत ही निवडणूक यंत्रणा त्यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांना भाजपच्या तिकीटावर लढण्याची ऑफर दिली होती. ती नाकारल्याने आता त्यांना रोखण्यासाठी हा पक्ष सज्ज झाला आहे. राज्यातील बहुसंख्य नेत्यांना प्रचारात उतरविण्याचे नियोजन असून घर टू घर प्रचाराची यंत्रणा राबविण्यात येणार आहे. ही निवडणूक कदम आणि जाधव यांच्यात होत असली तरी प्रतिष्ठा मात्र चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील यांचीच पणाला लागली आहे. दोघांनाही एकमेकांना रोखायचे आहे. कदम हे महाडिक यांचे पाहुणे आहेत. त्यामुळे कदमांचा पराभव हा महाडिकांचा पराभव मानला जाणार असल्याने पालकमंत्री अधिक आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. याउलट जाधव यांचा पराभव झाल्यास तो अप्रत्यक्ष पालकमंत्र्यांना धक्का मानला जाणार आहे. म्हणून महाडिक बंधू जोरात कामाला लागले आहेत. सोबत भाजपची ताकद आहे. क्लिक करा आणि वाचा- भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले महेश जाधव आणि शिवसेनेला लढण्याची संधी न मिळाल्याने नाराज झालेले क्षीरसागर हे सध्या दोन्ही पक्षांना अडचणीचे वाटत आहेत. दोघांची नाराजी तात्पुरती दूर करण्यात यश आले आहे. पण महाविकास आघाडीतील धुसफूस आणि भाजपमधील अंतर्गत वादाचा फटका कुणाला बसणार यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tPDxVsA

No comments:

Post a Comment