मुंबई: सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते, माजी खासदार यांनी आणखी एक दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री यांच्या विरोधात आता फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. ( has claimed that action will be taken against Transport Minister ) किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हा दावा केला आहे. ते म्हणतात की, अनिल परब यांच्या विरोधात आता फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत रत्नागिरी कोर्टात दावा दाखल करण्यात आला आहे. बेनामी मालमत्ता, मनी लाँड्रिंग अशा सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. आता अनिल परब यांचाच नंबर आहे, असे सोमय्या यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे. क्लिक करा आणि वाचा- काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर घणाघाती टीका करत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे पिता-पुत्र तुरुंगात जातील असा दावा केला होता. त्यानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. आता परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेत आपण संजय राऊत यांच्या आक्रमणाने जराही विचलित होणार नाहीच, पण आपल्या आपल्या लढाईत मागेही हटणारे नाही, असे सूचित केले आहे. क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेचा माफिया सेना असा उल्लेख शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचा माफिया सेना असा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेची संपूर्ण प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना आपली जागा दाखवली आहे. संजय राऊत यांच्या द्वारे स्टंटबाजी करून काहीही साध्य होणार नाही हे देखील त्यांना आता समजले आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत यांच्यावर सोमय्यांचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर स्वरुपाचा आरोपही लावला आहे. संजय राऊत यांनी आपल्याला मारण्यासाठी पुण्यात शिवसेनेच्या ७७ गुंडांना पाठवले होते. यांमध्ये ३० मुंबईचे होते, असे सांगताना माफिया सेनेत जर दम असेल, तर त्यांनी आपल्याला हात लावून दाखवावा असे आव्हानही त्यांनी शिवसेनेला केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/n1cmhyP
No comments:
Post a Comment