Breaking

Friday, March 11, 2022

जब तक जिंदा हुं, आप के घर को आंच नही आने दूंगा: आव्हाड https://ift.tt/MYFyqI1

ठाणे: गेल्या महिन्याभरापासून रेल्वे रूळा शेजारी असलेल्या झोपडपट्ट्यांना रेल्वेकडून जागा खाली करण्यासाठी अनेक नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्या नोटीसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे प्रबंधक कार्यालय () ऑफिस येथे हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज सर्व नागरिक मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालय येथे पोहचले. त्यावेळी त्या ठिकाणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. यांनी उपस्थिती लावत प्रबंधक शलभ गोयल यांची भेट घेतली. यावेळी ही जागा रेल्वे प्रशासनाची नसून महाराष्ट्र सरकारची असल्याची माहिती आव्हाडांनी प्रबंधक यांना दिली. तसेच जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत तुमच्या घरावर संकट येऊ देणार नसल्याचे आश्वासन यावेळी आव्हाडांनी नागरिकांना दिले. (minister assured the people that as long as i am alive there will be no crisis about your house) क्लिक करा आणि वाचा- मुंब्रा येथील शाहू नगर परिसरातील रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर या झोपडपट्टी रेल्वे धारकांना प्रशासनाकडून दुसऱ्यांदा नोटीस बजावत आपल्या घराच्या कागदपत्रांसह ११ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक येथील रेल्वे प्रबंधक कार्यालय ऑफिसला पोहचण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व नागरिक हे रेल्वे प्रबंधक कार्यालय शलभ गोयल यांच्या ऑफिसमध्ये पोहचले. मात्र या नागरिकांच्या मदतीसाठी त्याठिकाणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड पोहचले. आव्हाड यांनी रेल्वे प्रबंधक शलभ गोयल यांची भेट घेतली. नागरिकांचे असलेली कागदपत्रांनुसार हे नागरिक ३० ते ३५ वर्षापासून या ठिकाणचे रहिवाशी असल्याची बाब आव्हाडांनी गोयल यांच्या लक्षात आणून देत. क्लिक करा आणि वाचा- ज्या जागेवर नागरिक राहत आहे ती जागा रेल्वे प्रशासनाची नसून महाराष्ट्र सरकारची जागा असल्याची माहिती यावेळी आव्हाडांनी गोयल यांना दिली. रेल्वे प्रबंधक गोयल यांना या जमिनी बद्दल काही माहितीच नसल्याचे आव्हाडांनी सांगितले. नोटीस बजावल्या आहेत. तर, आम्ही या नागरिकांना पुढे येऊन देणार नाही. आम्ही स्वतः पुढे जाऊन लढू की, ही आमच्या महाराष्ट्र सरकारची जागा आहे. तसेच, एकही झोपडे तोडू देणार नसल्याचे अधिवेशनात देखील सांगितले असल्याचे आव्हाडांनी यावेळी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- प्रबंधक यांच्या भेटीनंतर आव्हाड यांनी नागरिकांची भेट घेत माझ रेल्वे प्रबंधक यांच्याशी बोलणे झाले असून जो पर्यंत मी जिवंत आहे, तो पर्यंत तुमच्या घरावर संकट येऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cjSRhl7

No comments:

Post a Comment