नवी मुंबई : आरसीबीने या सामन्यात केकेआरवर विजय मिळवला खरा, पण त्यांनी एक मोठी संधी गमावली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर आरसीबीने बाजी मारली. केकेआरने आरसीबीला विजयासाठी १२९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा ३ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर शेरफेन रदरफोर्ड मैदानात उभा राहीला आणि त्याने संघाला विजयासमीप पोहोचवले. आरसीबीने या सामन्यात केकेआरवर तीन विकेट्स आणि चार चेंडू राखून विजय मिळवला. पण यावेळी आरसीबीला मोठा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी होती, पण ती त्यांनी गमावली. या विजयानंतरही ते केकेआरच्या खाली सहाव्या स्थानावरच आहेत. केकेआरच्या १२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला पहिल्याच षटकात धक्का बसला. केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवले आरसीबीच्या अनुज रावतला शून्यावर बाद केले. केकेआरचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने यावेळी आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस आऊट करत मोठे यश मिळवले. फॅफला या सामन्यात पाच धावांवर समाधान मानावे लागले. विराट कोहलीच्या रुपात आरसीबीला मोठा धक्का बसला. मोठी खेळी साकारण्यात कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. कोहलीने या सामन्यात सात चेंडूंत दोन चौकारांच्या जोरावर १२ धावा करता आल्या. त्यावेळी आरसीबीची ३ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर शेरफेन रदरफोर्डने खेळपट्टीवर तग धरला होता. पण संघाचा विजय जवळ आलेला असतानाच तो २८ धावांवर बाद झाला. केकेआरला सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अजिंक्य रहाणे (१०) आणि वेंकटेश अय्यर (९) हे दोन्ही सलामीवीर यावेळी लवकर आऊट झाले आणि त्यानंतर केकेआरचे गणित बिघडले. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केकेआ़रला वेंकटेश अय्यरच्या रुपात पहिला धक्का बसला. वेंकटेश अय्यरला यावेळी आरसीबीच्या आकाश दीपने आपल्याच गोलंदाजीवर बाद केले. वेंकटेशला यावेळी १० धावा करता आल्या. पहिल्या सामन्यात ४४ धावांची दमदार खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेला दुसऱ्या सामन्यात मात्र जास्त धावा करता आल्या नाहीत. अजिंक्याला या सामन्यात फलंदाज ९ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर केकेआरच्या संघाला कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात मोठा धक्का बसला. श्रेयसने यावेळी १० चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या जोरावर १३ धावा केल्या. त्यामुळे केकेआरची ४ बाद ४६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर केकेआकच्या सर्वात मोठ्या अपेक्षा या धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलवर होत्या. कारण रसेलने आतापर्यत तुफानी खेळी साकारत संघाला सावरले होते. रसलने यावेळी चांगली सुरुवात केली खरी, पण त्यालाही मोठी खेळी साकारून संघाला सावरण्यात अपयश आले. रसेलला आरसीबीच्या हर्षल पटेलने बाद केले. रसेलने यावेळी तीन षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर २५ धावा केल्या. त्यानंतर केकेआरच्या शेपटाने चांगली फलंदाजी केली आणि त्यामुळेच त्यांना १२८ धावा करता आल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eQnrh4K
No comments:
Post a Comment