Breaking

Tuesday, March 29, 2022

भारतातील करोनामृत्यूंबाबतचं सत्य आलं समोर; केंद्राने 'तो' आरोप फेटाळला https://ift.tt/KeEOBTb

नवी दिल्ली: प्रगत देशांतील संसर्गस्थितीचा विचार करता भारतातील करोनामृत्यूंचे प्रमाण सर्वांत कमी होते, अशी महत्त्वाची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी आज राज्यसभेत दिली. भारतात १० लाखांमागे ३७४ मृत्यू झाल्याचे त्या म्हणाल्या. तर , ब्राझिल, रशिया, मेक्सिकोसारख्या देशांमध्ये हा आकडा प्रचंड होता, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीतून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. ( ) वाचा : नोंदवलेल्या मृत्यूंपेक्षा देशात अधिक असल्याचा दावा वेगवेगळ्या माध्यमांतून केला जात असला तरी तो निराधार आहे. हे दावे प्रामुख्याने चुकीच्या माहितीच्या आधारे आणि चुकीच्या पद्धतीने तयार केले गेले आहेत, असे त्या म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार प्रति दहालाख लोकसंख्येमागे झालेल्या मृत्यूंच्या प्रमाणामध्ये तळाच्या देशांपैकी एक आहे. भारतात प्रति दहा लाख लोकसंख्येमागे ३७४ मृत्यू झाले. अमेरिकेमध्ये हेच प्रमाण २,९२०, ब्राझिलमध्ये ३,०९२, रशिया २,५०६ तर मेक्सिकोमध्ये २,४९८ होते, असे त्यांनी सांगितले. वाचा : देशातील कोणत्याही राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद करण्याबाबत तेथील प्रशासनाला दिशानिर्देश दिले गेलेले आहेत. आयसीएमआरकडून हे निर्देश दिले गेले आहेत. त्यानुसार मृत्यूंची नियमित नोंद केली जात असून ही आकडेवारी आरोग्य विभागाकडेही येत असते. याशिवाय करोनाबाबतच्या संपूर्ण आकडेवारीचा तपशील 'पब्लिक डोमेन'मध्येही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. देशात १ हजार २५९ नवे बाधित देशात गेल्या १२५९ नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून ३५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ४,३०,२१,९८२वर पोहोचली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ हजार ३७८ आहे. आतापर्यंतच्या एकूण करोनाबळींचा आकडा ५,२१,०७० झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७५ टक्के असून ०.०४ टक्के रुग्ण उपचाराधीन आहे. २४ तासांत उपचाराधीन रुग्णांची संख्या ४८१ने कमी झाली. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kNKmn52

No comments:

Post a Comment