Breaking

Sunday, March 27, 2022

Imran Khan यांनी टाकला अखेरचा डाव; खुर्ची धोक्यात येताच म्हणाले... https://ift.tt/jW0qNZ2

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्याविरोधात सादर करण्यात आल्याने देशात मोठी राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. या प्रस्तावावर लवकरच मतदान होणार असून इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सरकारविरोधात भूमिका घेण्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर आज इम्रान खान यांनी जाहीर सभा घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत लोकांना भावनिक आवाहन करत खान यांनी 'व्हिक्टिम कार्ड' खेळण्याचाही प्रयत्न केला आहे. () इस्लामाबाद येथील परेड ग्राउंडवर इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाने आज भव्य सभेचं आयोजन केलं होतं. या सभेसाठी इम्रान यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी म्हटलं की, 'माझ्या मंत्र्यांना आर्थिक आमिष दाखवून खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाकिस्तानातील जनता आजही माझ्यासोबत आहे आणि म्हणूनच मला तुमचा अभिमान आहे. हा देश कशासाठी बनवला गेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. विरोधी पक्षातील लोकांनी माझ्याविरुद्ध कारस्थान रचलं आहे, परंतु तुम्ही त्यांना यशस्वी होऊन देऊ नका,' असं आवाहन इम्रान खान यांनी केलं आहे. इम्रान खान यांचं सरकार का अडचण आलं? विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांना घेरण्याची रणनीती बनवली असतानाच इम्रान यांच्या पीटीआय पक्षाच्या २४ खासदारांनीही आपल्याच सरकारविरोधात बंडाचं निशाण फडकावलं. लष्करप्रमुख बाजवा यांचेही इम्रान यांच्यासोबत मतभेद झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, विरोधी पक्षातील सर्व नेते एकजूट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्ची धोक्यात आली आहे. पाकिस्तानात काय आहेत राजकीय गणिते? पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण ३४२ सदस्य आहेत. इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १७२ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. इम्रान खान अध्यक्ष असलेल्या पीटीआयच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे १७९ सदस्यांचे बळ आहे. त्यात पीटीआयचे १५५ सदस्य आहेत. मात्र आपल्यासोबत असलेलेच काही खासदार आणि मंत्री बंडाच्या तयारीत असल्याने इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5oVeG6k

No comments:

Post a Comment