Breaking

Friday, April 8, 2022

Gujarat Titans Win गुजरात टायटन्सचा अखेरच्या चेंडूवर थरारक विजय; विजयाची हॅटट्रीक https://ift.tt/qE1mD2S

मुंबई: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने पंजाब किंग्जचा धुरळा उडवला. आयपीएल २०२२च्या १६व्या लढतीत गुजरातने पंजाबचा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. आयपीएलच्या या हंगामात विजयाची हॅटट्रिक करणारा आणि आतापर्यंत एकही पराभव न स्विकारणारा एकमेव संघ ठरला आहे. या विजयासह ते गुणतक्त्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. वाचा- पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत गुजरात समोर विजयासाठी १९० धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. गुजरातची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मॅथ्यू वेड फक्त ६ धावांवर माघारी परतला. पंजाबने चौथ्या ओव्हरमध्ये गुजरातला धक्का दिल, त्यामुळे ते सामन्यावर पकड मिळवतील असे वाटले होते. पण दुसरा सलामीवीर शुभमन गिलच्या मनात वेगळाच प्लॉन सुरू होता. शुभमन पंजाबच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने धावांचा वेग असा काही वाढवला की सामना पंजाबच्या हातातून निसटू लागला. गिलने २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गुजरातने ११व्या षटकात शतक पूर्ण केले. गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागिदारी केली. ही जोडी विजय मिळवून देईल असे वाटत होती. पण साई ३५ धावांवर बाद झाला. त्याने ३० चेंडूत १ षटकार आणि ४ चौकार मारले. वाचा- १९व्या षटकात शतकाच्या जवळ पोहोचलेला शुभमन ९६ धावांवर बाद झाला, त्याचे शतक ४ धावांनी हुकले. गिलने १ षटकार आणि ११ चौकार मारले. गुजरातला अखेरच्या ६ चेंडूत १९ धावांची गरज होती. ओडियन स्मिथने पहिला चेंडू वाईड टाकला. पण त्यानंतरच्या चेंडूवर पंजाबला मोठी विकेट मिळाली, हार्दिक पंड्या धावाबाद झाला. हार्दिकच्या जागेवर आलेल्या डेव्हिड मिलरने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला, त्यानंतर एक धाव घेतली. आता गुजरातला विजयासाठी २ चेंडूत १२ धावांची गरज होती. दोन षटकारच त्यांना सामना जिंकून देऊ शकत होते. फलंदाजी राहुल तेवतिया करत होता. त्याने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग दोन षटकार मारून धमाकेदार विजय मिळून दिला. तेवतियाने ३ चेंडूत नाबाद १३ तर मिलरने ४ चेंडूत ६ धावा केल्या. त्याआधी सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबच्या डावाची सुरूवात कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी केली. पण दुसऱ्याच षटकात मयांक ५ धावांवर बाद झाला. तर पाचव्या षटकात जॉनी बेयरस्टो देखील फक्त ८ धावा करून माघारी परतला. यामुळे पंजाबची अवस्था २ बाद ३४ अशी झाली होती. बेयरस्टोच्या जागी आलेल्या लियाम लिविंगस्टोनने तिसऱ्या विकेटसाठी सलामीवीर शिखर धवन सोबत चांगली भागिदारी केली, ही जोडी संघाला शतक पूर्ण करून देईल असे वाटत होते, तेवढ्यात शिखर ३५ धावांवर माघारी परतला. १४व्या षटकात दर्शन नलकांडेने सलग दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. यामुळे पंजाब बॅकफुटवर गेला. पण एकाबाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला लिविंगस्टोनची धमाकेदार फलंदाजी सुरू होती. त्याने २१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. मधळ्या फळीतील स्फोटक फलंदाज शाहरूख खानने ८ चेंडूत १५ धावा केल्या. लिविंगस्टोन मोठी धावसंख्या उभी करले असे वाटत असताना तो ६४ धावांवर माघारी परतला. त्याला राशिद खानने बाद केले. लिविंगस्टोनने २७ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकार मारले. पंजाबने १६व्या षटकात ७ विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे संघ २० षटके फलंदाजी करेल का अशी शंका वाटत होती. तळातील फलंदाजांमध्ये राहुल चहरने १४ चेंडूत नाबाद २२ तर अर्शदीप सिंगने ५ चेंडूत नाबाद १० धावांचे योगदान दिले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक ३, दर्शनने २ तर मोहम्मद शमी, हार्दिक, लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HDBmMzp

No comments:

Post a Comment