पुणे : मुंबई इंडियन्सचे पराभवाचेच पाढे पुन्हा एकदा या सामन्यात पाहायला मिळाले. या पराभवामुळे मुंबईवर गुणतालिकेत नवव्या स्थानावर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. सूर्यकुमारच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईला आरसीबीपुढे १५२ धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करतााना आरसीबीने चांगली सुरुवात करत ५० धावांची सलामी दिली. फॅफ ड्यु प्लेसिस यावेळी १६ धावांवर बाद झाला असला तरी त्यानंतर अनुज रावत आणि विराट कोहलीने आरसीबीसाठी धडाकेबाज फटकेबाजी केली. अनुज आणि कोहली यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आरसीबीने सात विकेट्स राखत मुंबईवर विजय साकारला. आरसीबीच्या अनुज रावतने यावेळी ६६ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली, तर विराट कोहलीनेही ४८ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच आरसीबीचा विजय सुकर झाला. सूर्यकुमार यादवने यावेळी नाबाद ६८ धावांची दमदार खेळी साकारली आणि त्यामुळे मुंबईला आरसीबीपुढे विजयासाठी १५२ धावांचे आव्हान ठेवता आले. पण त्यापूर्वी, मुंबईच्या संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्येच बिनबाद ४९ अशी धावसंख्या उभारता आली. पण रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आणि मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. या सामन्यात रोहितला १५ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २६ धावा करता आल्या. रोहित बाद झाला आणि त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. डेव्हाल्ड ब्रेव्हिसच्या रुपात मुंबईला यावेळी दुसरा धक्का बसला, त्याला आठ धावांवर समाधान मानावे लागले. यावेळी संघाची सर्व जबाबदारी िशान किशनवर होती, कारण तोच स्थिरस्थावर झालेला फलंदाज होता. पण स्थिरस्थावर झालेला इशान किशन बाद झाला आणि मुंबईला मोठा धक्का बसला. इशानला यावेळी २६ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सच्या संघावर ९ चेंडूंत ३ महत्वाचे फलंदाज गमावण्याची नाुमष्की ओढवली. इशान आणि रोहितने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण बिनबाद ५० वरून मुंबईची ४ बाद ६२ अशी परिस्थिती झाली. तिलक वर्माच्या रुपात मुंबईला चौथा धक्का बसला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर कायरन पोलार्ड हा खेळपट्टीवर होता आणि तो आता गेल्या सामन्यासारखी कमाल करतो का, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण कायरन पोलार्डच्या रुपात मुंबईला पाचवा धक्का, बसला, त्याला शून्यावर बाद व्हावे लागले. त्यामुळे मुंबईची ५ बाद ६२ अशी अवस्था झाली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/g4CbhWv
No comments:
Post a Comment