Breaking

Sunday, April 17, 2022

अंधभक्त जिथे फायदा असेल तिथे झुकतो, राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र https://ift.tt/3XU17kg

मुंबई : अंधभक्त जिथे फायदा असेल तिथे झुकतो.अंधभक्त काही वेळेला दैवत बदलू शकतो, अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी मनसे प्रमुख यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. आतापर्यंत मराठीच्या मुद्द्यावर जोर देणाऱ्या राज ठाकरेंनी जय श्रीरामचा नारा देत कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. शिवसेनेपासून दुरावलेली हिंदुत्ववादी मतं घेण्यासाठी राज ठाकरे आटोकाट प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर आसूड ओढला. 'आंबेडकर ऑन पाप्युलेशन-कंटेंपररी रिलिव्हन्स' या नितीन राऊत यांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खरगे, के. राजू, सेल्वम, केव्हिन ब्राऊन, प्रा.सुखदेव थोरात, प्रा.प्रदीप आगलावे यांच्या उपस्थितीत आज प्रकाशन पार पडले. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. अंधभक्त काही वेळेला दैवत बदलू शकतो. अंधभक्त जिथे फायदा असेल तिथे झुकतो. अंधभक्त म्हणजे फक्त उदो उदो करत सुटायचं. कुणाला दैवत मानण्यामागे स्वार्थ असतो, अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली. नितीन राऊत यांचं कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, "राजकारणी अभ्यासू नसतात हा समज खोटा ठरवल्याबद्दल मी डॉ. नितीन राऊत यांचे सर्व राजकारण्यांच्यावतीने आभार मानतो. नितीन राऊत बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत."


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1HLfltF

No comments:

Post a Comment