मुंबई : आरसीबीच्या संघाने आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर १६ धावांनी दमदार विजय मिळवला. पण हा सामना संपल्यावर आरसीबीच्या संघाला अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आरसीबीच्या संघाला सामना संपल्यावर कोणती आनंदाची बातमी मिळाली आहे, पाहा...दिनेश कार्तिकच्या वादळी फटकेबोजीमुळे आरसीबीला दिल्लीपुढे मोठे आव्हान ठेवता आले. दिनेशने यावेळी ३४ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद ६६ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेलनेही यावेळी ५५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच दिल्लीला १८९ धावांचा डोंगर उभारताला आला. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला सुरुवातीलाच पृथ्वी शॉ याला बाद करत दिल्लीला धक्का दिला. डेव्हिड वॉर्नरने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत आपले अर्धशतक झळकावले. वॉर्नरने यावेळी ३८ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६६ धावा केल्या. वॉर्नर बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी ही रिषभ पंतच्या खांद्यावर होती. पंतने यावेळी धडाकेबाज फलंदाजी केली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण पंत मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि दिल्लीच्या संघाचा पराभव निश्चित झाला. पंतने यावेळी १७ चेंडूंतमध्ये दमदर ३४ धावा केल्या. पण आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात विजय मिळवत आरसीबीच्या संघाने एकूण आठ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत आता तिसरे स्थान पटकावले आहे. सध्याच्या घडीला गुणतालिकेत गुजरात, लखनौ आणि आरसीबी यांचे समान आठ गुण आहेत. पण रनरेटच्या जोरावर गुजरातेन पहिले, तर लखनौने दुसरे स्थान पटकावले आहे आणि आरसीबीचा संघ या विजयासह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे दिल्लीचा संघ हा पराभवानंतर चार गुणांसह सातव्या स्थानावरच राहीला आहे. सर्वच संघांनी आता प्ले-ऑफच्या दिशेने मार्गक्रमण सुरुवात करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आयपीएलची चुरस आणखीनच वाढलेली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PMGxhAg
No comments:
Post a Comment