अमरावती: आपल्या मुलासोबत करावे म्हणून दीड लाख रुपये देण्याचे कबूल केल्यानंतर लग्नासाठी तयार झालेल्या तरूणीने लग्न लागताच आपल्या साथीदारांसह दीड लाख रुपये घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडला आहे. हे लग्न अमरावतीतील एका एका दलालाच्या घरात झाले. या फसवणुकीप्रकरणी बडनेरा पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (within an hour after the the ran away with rs one and half lakh) या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रतलाम येथे राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या मुलाचे शहरातील एका तरुणी सोबत लग्न ठरले. नवरीच्या कुटुंबीयांना नवरदेवाकडून दीड लाख रुपये देण्याचेही ठरले होते. दरम्यान, २२ एप्रिलला अमरावतीत एका दलालाच्या घरातच एकमेकांना हार घालून लग्नसोहळा उरकण्यात आला. त्यानंतर नवरीने नवरदेवासह त्याच्या नातेवाइकांना सांगितले की, ‘ही रक्कम आईच्या खात्यात टाकायला बँकेत जाते. त्यामुळे दीड लाखाची रक्कम घेऊन गेलेली नवरी बराचवेळ होऊनही परतलीच नाही. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने बडनेरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात नवरी बनलेल्या तरुणीसह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. क्लिक करा आणि वाचा- असलम मिया शेरुमिया (५०, रा. बेगम बाग कॉलनी, उज्जैन), हर्षद दिलीपराव अलोने (३३ रा. कृषक कॉलनी, मोती नगर अमरावती) या दोघांसह नवरी बनलेली तरुणी व अन्य एक महिला अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हर्षद अलोनेला अटक केली आहे. रतलाम येथील व्यावसायिक राजेश रमेश चंद्र केथुनिया (५०, रतलाम) असे तक्रारदाराचे नाव आहे. राजेश केथुनिया यांचा मुलगा दिव्यांग असल्यामुळे त्याच्यासोबत लग्नासाठी रतलाम परिसरात मुलगी मिळत नव्हती. दरम्यान, राजेश केथुनिया यांची ओळख उज्जैन येथील असलममिया नामक व्यक्तीसोबत होती. राजेश केथुनियाने मुलासाठी आपल्या भागात मुलगीच मिळत नसल्याचे सांगितल्यामुळे अस्लम मिया म्हणाला,‘अमरावतीत एक मुलगी आहे. मात्र, ती गरीब घरातील आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना आपल्याला दीड लाख रुपये द्यावे लागतील. त्यावर राजेश केथुनियांनी होकार दिला. क्लिक करा आणि वाचा- २२ एप्रिलला राजेश केथुनिया त्यांच्या मुलाला घेऊन अमरावतीत आले. त्यावेळी दलाल अस्लम मियाने त्यांची भेट शहरातील दलाल हर्षद अलोनेसोबत घालून दिली. त्यानंतर नवरदेव मुलगा व केथुनियांना घेऊन अस्लम व हर्षद यांनी साईनगर भागात असलेल्या खंडेलवाल नगरमधील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये नेले. त्याच ठिकाणी फ्लॅटमध्ये २२ एप्रिलला एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्नसोहळा पार पडला. त्यावेळी राजेश केथुनिया यांनी दीड लाख रुपये मुलीच्या हातात दिले. लग्नानंतर तासाभरात केथुनियाच्या दृष्टीने या प्रकरणात नवरदेवाच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकाला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा- ही रक्कम मी माझ्या आईच्या खात्यात टाकण्यासाठी बँकेत जाते, असे नववधूने सांगितल्यानंतर अस्लम व हर्षद हेसुद्धा तिच्यासोबत गेले. काही वेळानंतर अस्लम परत फ्लॅटवर आला व त्याने केथुनियांना सांगितले की, नवरीने दुचाकीवरून उडी मारली व ती रक्कम घेऊन पसार झाली. दरम्यान, आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रतलामला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रतलामला जाऊन त्यांना लक्षात आले की, नवरी बनून आलेली तरुणी व दोन्ही दलालांनी आपली केली. त्यामुळे राजेश केथुनियांनी बडनेरा पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0BCWAu9
No comments:
Post a Comment