अमरावती: अमरावतीतील भारतीय जनसंचार संस्थान () केंद्र हे देश विघातक चळवळीचे केंद्र बनले असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे नेते गोपाल गुप्ता यांनी एका पत्राद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. अर्बन नक्षलवादाच्या कामांना या ठिकाणाहून प्रोत्साहन दिले जात असून क्षेत्रीय संचालक व्ही. के. भारतीय यांच्याविरुद्ध तपास करण्याची मागणी केली आहे. या पत्राने पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (bjp leader complains directly to pm modi and home minister amit shah) काही दिवसांपूर्वी येथील कंत्राटी कर्मचारी व रिजनल डायरेक्टर यांच्यातील वाद पोलीस ठाण्यातून थेट न्यायालयात पोहोचला होता. दरम्यान, आता भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे राज्याचे सेक्रेटरी गोपाल गुप्ता यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा- गोपाल गुप्ता यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैचारिक स्वच्छतेवर प्राधान्य दिले आहे. मात्र येथील IIMC केंद्रातून केंद्र सरकार, भारतीय संस्कृती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांवर निशाणा साधला जात आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्र सरकार विरोधात गरड ओकणाऱ्या लोकांना अमरावती येथील आयआयएमसीमध्ये व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात येते. त्यांना बोलावण्यात येऊ नये अशी मागणीसुद्धा गुप्ता यांनी आपल्या पत्रात केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील अत्युच्च ज्ञान मिळावे याकरिता २०११ साली अमरावती विद्यापीठाच्या परिसरात भारतीय जनसंचार संस्थांचे एक केंद्र सुरू करण्यात आले. येथे सध्या इंग्रजी व मराठी पत्रकारितेचे धडे घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येतात. मात्र मागील काही वर्षांपासून हे केंद्र वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. क्लिक करा आणि वाचा- गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीत सदर केंद्र हे राजकीय व भारत विरोधी गतिविधि चालत असल्याचे सुद्धा सांगितले आहे. श्री गुप्ता यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rM5mPWE
No comments:
Post a Comment