डोंबिवली: मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे, पण ज्या प्रकारचे राजकारण आज सुरू आहे ती आपली संस्कृत नाही. उद्या महाराष्ट्र दिन असून अनेकांना स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार, अशा शब्दात खासदार यांनी विरोधकाना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. सूडाचे, द्वेषाचे आणि कमरेखाली वार करणारे राजकारण सध्या देशात सुरू असून यापूर्वी असे राजकारण कधीच झाले नाही, असे म्हणत त्यांनी आणि केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. (shiv sena mp criticizes mns chief indirectly) शिवसेना व युवा सेनेतर्फे डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलावर मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस सुरू असलेल्या महोत्सवात कोल्हापूर, सांगली, पुणे, कल्याण, नाशिक, ठाणे, पारनेर आणि कोकणातून मिसळ स्टॉलधारकांनी सहभाग घेतला आहे. मिसळ महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांनी मिसळ खायला चांगलीच गर्दी केली होती. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या मिसळ महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी मिसळीचा आस्वाद देखील घेतला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. क्लिक करा आणि वाचा- 'भाजपकडून नवहिंदू ओवेसींना महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात लढवण्याचे काम' औरंगाबाद येथे यांच्या होणाऱ्या सभेबाबत बोलताना एक हिंदू ओवेसी आणि मुस्लिम ओवेसी दोन्ही महाराष्ट्रात आहेत, असे वक्तव्य करत राऊत यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने एका ओवसीचा उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी केला, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही नव हिंदू ओवेसीला शिवसेनेविरोधात लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करीत असल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. क्लिक करा आणि वाचा- तर, सध्या महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, 'ज्याप्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे ते पाहता ही आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक, विविध विचारांचे लोक एकमेकांच्या भूमिकांना विरोध करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर किंवा पवारांनी बाळासाहेबांवर वेळोवेळी टिका केली. परंतु, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुड, द्वेष आणि कमरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नाही. भाजपने गेल्या २-४ वर्षांत सुरू केलेले राजकरण महाराष्ट्र आणि देशाला परवडणारे नाही.' क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/b9lrvVX
No comments:
Post a Comment