Breaking

Thursday, April 7, 2022

रशियाला संयुक्त राष्ट्रांचा आणखी एक झटका; भारताचा 'तो' पवित्रा कायम https://ift.tt/C6KY4Qu

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेतून ( ) रशियाला निलंबित करण्याचा प्रस्ताव आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ( United Nations General Assembly ) बहुमताने मंजूर करण्यात आला. युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा आणखी एक झटका ठरला आहे. दरम्यान, रशियाबाबत तटस्थ राहण्याचा आपला पवित्रा कायम ठेवत भारताने यावेळीही मतदानात भाग घेतला नाही. ( ) वाचा : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव अमेरिकेनेच संयुक्त राष्ट्रांपुढे ठेवला होता. युक्रेनची राजधानी कीव्हचं उपनगर येथे धक्कादायक हत्याकांड घडलं. तेथील भीषण छायाचित्रे आणि व्हिडिओ झळकले. यासाठी रशियन फौजांना जबाबदार धरत अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनी रशियाला युनोच्या मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याची भूमिका मांडली होती. त्यानुसार अमेरिकेकडून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेपुढे ठेवला गेला होता. आज या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले असता ९३ देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले तर २४ देशांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. या मतदानात भारतासह ५८ देशांनी भाग घेतला नाही व तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. बहुमताच्या आधारे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. वाचा : दरम्यान, आणि या दोन देशांत गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून युद्ध भडकलं आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका तसेच ब्रिटन आणि युरोपमधील अन्य काही देशांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर रशियाची कोंडी करण्यासाठी अनेक पावले टाकली आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, , मानवाधिकार परिषद येथे असे वेगवेगळे १० प्रस्ताव आतापर्यंत सादर करण्यात आले असून या सर्व प्रस्तावांवर भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. युक्रेनमधील हिंसाचार तत्काळ थांबला पाहिजे. दोन्ही देशांनी चर्चेचा मार्ग अवलंबला पाहिजे, अशी भूमिका भारताने वेळोवेळी मांडलेली आहे. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oAvqmbn

No comments:

Post a Comment