पुणे : मुंबई इंडियन्सला तिसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराबव पत्करावा लागला. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. मुंबईसाठी हा पराबव तर लाजीरवाणा होता. पॅट कमिन्सने तर यावेळी फक्त १५ चेंडूंमध्ये चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारली आणि सामना केकेआरच्या बाजूने फिरवला. पण सलामीवीर वेंकटेश अय्यरनेही यावेळी ४१ चेंडूंत नाबाद ५० धावांची खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करत मुंबईला केकेआरपुढे १६२ धावांचे आव्हान ठेवता आले. केकेआरने हे आव्हान पाच विकेट्स आणि चार षटके राखून पूर्ण केले. मुंबईच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणेच्या रुपात अजिंक्यला पहिला धक्का बसला. अजिंक्यला यावेळी सात धावा करता आल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरही १० धावांवर बाद झाला. त्यानंतर सॅम बिलिंग्स आणि नीतिष राणा हेदेखील बाद झाले व केकेआरचा संघ अडचणीत सापडला. पण त्यावेळी वेंकटेश अय्यर आणि पॅट कमिन्स हे केकेआरच्या संघासाठी धावून आले. या दोघांनाही अर्धशतक साकारत संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि तिलक वर्मा व कायरन पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १६१ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला. उमेश यादवने यावेळी रोहितला बाद केले, रोहितला यावेळी फक्त तीन धावा करता आल्या. रोहित बाद झाल्यावर मुंबईला मोठा धक्का बसला होता. पण यावेळी मुंबईच्या संघाला सावरले ते डेवाल्ड ब्रेव्हिसने. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत २९ धावांची खेळी साकारली. यावेळी त्याच्यापुढे इशान किशनही फिका पडत असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशनला तिसऱ्या सामन्यात मात्र चांगली फलंदाजी करता आली नाही. इशानने या सामन्यात २१ चेंडूंचा सामना केला, पण त्याला फक्त १४ धावाच करता आल्या. त्यावेळी मुंबईची ३ बाद ५५ अशी स्थिती झाली होती. पम त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली व संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सूर्यकुमारने यावेळी ३६ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. कायरन पोलार्डने यावेळी पाच चेंडूंत तीन षटकार खेचत नाबाद २२ धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर तिलक वर्माने यावेळी २७ चेंडूंत ३८ धावा केल्या. या अखेरच्या षटकांतील फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tqxUNfM
No comments:
Post a Comment