मुंबई: ' वारसा यांचा मात्र विचारसरणी याची', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी मनसे अध्यक्ष यांच्या ठाण्यातील भाषणावर निशाणा साधला आहे. ( Vs ) वाचा : राज ठाकरे यांनी ठाणे येथील 'उत्तर'सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर बोचरी टीका केली. या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ' २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना विरोध आणि आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर', अशा शब्दांत पाटील यांनी राज यांच्या 'राज'कारणाचा समाचार घेतला. ' पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा मात्र, नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी! वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत', अशी खरमरीत टीकाही जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये केली आहे. वाचा: राज ठाकरे यांच्या निशाण्यावर पुन्हा महाविकास आघाडी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर टीका होत होती. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात होते. त्याला उत्तर देण्यासाठी ठाण्यात घेतलेल्या सभेत राज यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. शरद पवार यांच्याकडून घेण्यासारखे अनेक गुण आहेत पण त्यांच्या जातीच्या राजकारणाचे करायचे काय?, असा सवाल राज यांनी केला. शरद पवार यांच्यासारख्या बुजूर्ग नेत्याने राज्यातील जातीय भेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मात्र उलटंच चाललंय. तेच लोकांना यात अडकवत चालले आहेत. हा फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र असे पवार म्हणतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचं कधीही नाव घेत नाहीत. कारण मुस्लिम मते हातून जातील अशी त्यांना भीती वाटते, असा आरोप राज यांनी केला. पवारांवरील याच टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. राज यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्याबाबतची भूमिका कायम ठेवली. ३ मेपर्यंत हे भोंगे हटवले गेले नाहीत तर सगळ्याच मशिदींसमोर हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा राज यांनी दिला. समान नागरी कायदा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा करा, अशा मागण्या यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्या. राज यांच्या या भाषणाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7t94X0o
No comments:
Post a Comment