Breaking

Tuesday, April 12, 2022

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू https://ift.tt/mgqztfZ

मुंबई: राज्याचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. (social justice minister has suffered a and has been admitted to breach candy hospital) मंत्री याना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या घटनेची माहिती मिळताच ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेतेमंडळींनी धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मुंडे हे कार्यकर्तेप्रिय नेते असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी देखील ब्रिच कँडी रुग्णालयात धाव घेतली. क्लिक करा आणि वाचा- आता काळजीचे कारण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे. धनंजय मुंडे यांची प्रकृती पूर्ण स्थिर असून काळजी करण्यातचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, असे टोपे म्हणाले. मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dDLCUYJ

No comments:

Post a Comment