मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते ( ) यांनी राज ठाकरेंची ( ) आज मुंबईत भेट घेतली. यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नितीन गडकरींनी भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यानंतर गडकरी हे १२ वाजेच्या सुमारास राज यांच्या घरातून बाहेर पडले. यानंतर नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. काय म्हणाले नितीन गडकरी? ही राजकीय भेट नव्हती. माझे ठाकरे परिवारासोबत कौटुंबीक संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आणि नवीन घर पाहण्यासाठी भेट दिली. ही पूर्णपणे वैयक्तिक भेट होती. आजच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आणि कुठलाही राजकीय हेतू नाही, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी यांनी ठाकरे कुटुंबासोबत जेवण केलं. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य होते. यावेळी कौटुंबीक चर्चा झाली. जेवणानंतर नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिकरित्या जवळपास पाउण तास राजकीय चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. नितीन गडकरी यांनी ही वैयक्तिक भेट असल्याचं म्हटलं असलं तरी या भेटीच्या टायमिंगवरून जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. या मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GmKtPS8
No comments:
Post a Comment