Breaking

Monday, April 4, 2022

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पहिला राजीनामा पुण्यात https://ift.tt/HK4W5ye

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात अध्यक्ष () यांनी गुढीपाडव्यानिमित्त हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालत जोरदार भाषण केले होते. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा ऐकवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला होता. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेकरून मनसेतच भूकंप झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका न पटल्याने आता पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. (after raj thackerays statement mns are resigning and the first resignation has been given in pune) क्लिक करा आणि वाचा- पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत. क्लिक करा आणि वाचा- 'राजसाहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट आणली होती अन् ते म्हणाले होते मी शेतकरी जीन्स आणि टी-शर्ट मध्ये आणणार. त्यामुळे राजसाहेब माझे आदर्श होते अन् म्हणूनच मी पक्षात प्रवेश केला होता. पण आता राजसाहेबांनी राजकीय भूमिका बदलली आहे. म्हणून मी राजीनामा दिला आहे', असे माजिद शेख यांनी म्हटले आहे. २००९ पासून सच्चा मनसेचा सैनिक असणाऱ्या माजिद शेख यांनी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर हा राज्यातील पहिलाच राजीनामा आहे. त्यामुळे यानंतर हिंदुत्वाकडे झुकणाऱ्या मनसेला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/K9AhjVJ

No comments:

Post a Comment