नवी दिल्ली: या मल्टी - लेव्हल मार्केटिंग ( एमएलएम ) योजनेचा प्रचार करणाऱ्या कंपनीच्या ७५७ कोटींच्या मालमत्तेवर अर्थात ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत टाच आणली आहे. ईडीने सोमवारी निवदेनाद्वारे ही माहिती दिली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ( ) वाचा : कंपनी थेट विक्री एमएलएम नेटवर्कच्या पडद्याआडून घोटाळा करत आहे. कंपनीचा सदस्य बनून श्रीमंत कसे होता येईल, याचा प्रचार करण्यावर त्यांचे संपूर्ण लक्ष केंद्रीत आहे. उत्पादनावर लक्ष नाही, असा आरोप ईडीने केला आहे. कंपनीने दिलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किंमती या खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या तुलनेत जास्त आहेत, याकडे ईडीने लक्ष वेधले आहे. तर, आम्ही प्रलंबित मुद्द्यांवर निष्पक्ष, कायदेशीर आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याच्या दिशेने अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत, असे अॅम्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. प्रा. लि.च्या टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये तमिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील जमीन आणि कारखान्याची इमारत , प्लांट , मशिनरी , वाहने , बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे, असे तपास संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. टाच आणलेल्या एकूण ७५७.७७ कोटी रुपयांच्या मालमत्तेपैकी ४११.८३ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे, तर उर्वरित ३४५.९४ कोटी रुपये अॅम्वेच्या ३६ बँक खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम आहे. वाचा : सन २०११च्या तपासासंदर्भात आहे. तेव्हापासून कंपनी प्राधिकरणाला सहकार्य करत आहे आणि वेळोवेळी त्यांनी मागितलेली सर्व माहिती दिली आहे, असे अॅम्वेकडून सांगण्यात आले. सन २००२-०३ ते २०२१-२२दरम्यान कंपनीने २७ हजार ५६२ कोटी रुपये रक्कम व्यवसायातून जमा केली. यातील अमेरिका आणि भारतातील वितरक आणि सदस्यांना सात हजार ५८८ कोटी रुपये कमिशन दिले, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8I2MtRf
No comments:
Post a Comment