सोलापूर: उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या निधनाची पसरवण्यात आल्याने सोलापुरात खळबळ उडाली होती. खंदारे यांचे निकटवर्तीय सूर्यप्रकाश खंदारे याच्या फेसबुक अकाउंटवरुन सदरची पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. याबाबत सायबर क्राईम विभागाकडे रितसर तक्रार करणार असल्याचे यांनी म्हटले आहे.( of the death of a former Shiv Sena minister caused a stir in Solapur) क्लिक करा आणि वाचा- भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये राज्याचे माजी सामाजिक न्याय तथा क्रीडा राज्यमंत्री राहिलेल्या उत्तम प्रकाश खंदारे यांच्याबाबत खोडसाळपणा करण्यात आला असून फेसबुकवर चुकीची पोस्ट फिरत आहे, असा खुलासा त्याच्या निकटवर्तीयांनी, नातेवाईक आणि सेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, अशा प्रकारची थेट पोस्ट केली गेल्याने सोलापूर शहरात गोंधळ उडाला आहे. याबाबत शिवसेनेचे उत्तर तालुक्याचे नेते सुधीर गोरे यांनी ही अफवा असून कोणीही यावर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे. उत्तम प्रकाश खंदारे यांची तब्येत अतिशय चांगली आहे. ते घरीच आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना गोरे यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- सायबर क्राईम विभागाकडे करणार तक्रार माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासंदर्भातील फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर आंबेडकर नगरमधील खंदारे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. याप्रकरणी उत्तम प्रकाश खंदारे यांच्याशी थेट संपर्क साधला असता, कोणीतरी जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. हा काय प्रकार आहे हे अजून मला समजलेले नाही. याबाबत मी सायबर क्राईम विभागाकडे रितसर तक्रार करणार आहे, असे स्पष्टीकरण खंदारे यांनी दिले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xZQ6KPm
No comments:
Post a Comment