Breaking

Friday, April 8, 2022

गुणरत्न सदावर्तेंना अटक, दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांची कारवाई https://ift.tt/hqG0R8C

मुंबईः मुंबईत गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते ( ) यांना अटक केली आहे. दीड तासाच्या चौकशीनंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांना आठ वाजेच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर सदावर्ते यांना गावदेवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. शनिवार आणि रविवार आल्याने सदावर्ते यांचा मुक्काम सोमवारपर्यंत पोलिस कोठडीतच असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सदावर्ते यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांच्यावर कलम १४१, १४९, १२० ब (कट रचणे), अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे कलम ३५३, यासह चिथावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमविणे, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य आणि हल्ल्याचा कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना सदावर्ते यांची काही चिथावणीखोर भाषणंही मिळाली आहे. यात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना चिथावल्याचा दावा करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी रात्री आठ वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पथक धडकले. यात महिला पोलिसही होत्या. यानंतर पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले. यावेळी सदावर्ते यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या गंभीर आरोप केले. आपला खून करण्याचा प्रयत्न आहे. आपली हत्या होऊ शकते. आपल्या पत्नीने वळसे-पाटील यांच्याविरोधात तक्रार केली आहे, असा आरोप अटकेपूर्वी सदावर्ते यांनी केला. दुसरीकडे, सदावर्ते यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलेलं नाही. कुठलीही नोटीस न देता अटक केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि शरद पवार यांचा पोलिसांवर दबाव आहे, असा आरोप सदावर्ते यांच्या पत्नीने केला आहे. सदावर्ते यांची पत्नी आपल्या बाळासह गावदेवी पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहे. सदावर्ते यांची कन्याही पोलिस ठाण्यात आहे. पोलिसा आपल्याला सदावर्ते साहेबांना भेटू देत नाहीएत, असा आरोप ते करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dls0UNM

No comments:

Post a Comment