Breaking

Friday, April 8, 2022

पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत नाना पटोले यांचा मोठा दावा; म्हणाले... https://ift.tt/fGjl6i8

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार यांच्या मुंबईतील या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत, असे नमूद करतानाच या आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष यांनी केली आहे. ( ) वाचा : नाना पटोले म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारनेही त्यांच्या मागण्या मान्य केल्या. न्यायालयानेही एसटी संपावर निर्णय दिला तो निर्णयही सर्वांना मान्य आहे परंतु, आज अचानक एक मोठा जमाव शरद पवार यांच्या घरावर चाल करून जातो हा नियोजनबद्धरितीने केलेला हल्ला दिसत आहे. या आंदोलकांना कोणीतरी शिकवून पाठवलेले असावे. या आंदोलकांना भडकावणारा कोण आहे? या प्रकारामागे जो कोणी असेल त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. वाचा : आजही आम्ही सर्वजण एसटी कामगारांच्या पाठीमागे आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे पण अशा प्रकारे एखाद्या जेष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही मतभेद असतील, त्यांच्या काही मागण्या असतील तर चर्चेतून मार्ग निघू शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत जरब बसेल अशी कठोर कारवाई करावी, असे पटोले म्हणाले. यांना अटक शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी १०७ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एसटी आंदोलकांची बाजू कोर्टात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी काही वेळापूर्वीच अटक केली आहे. सदावर्ते यांना प्रथम घरातून ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. बेकायदा जमाव जमविणे, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य आणि हल्याचा कट रचणे या कलमांतर्गत सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hxsc0vY

No comments:

Post a Comment