दापोली: रत्नागिरी जिल्हयातील तालुक्यातील देगाव या गावात शनिवारी दुपारी गावातील जमावाने एका भंगारविक्रेत्यावर हल्ला करत त्याला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक दोन नव्हे तर चक्क २० हून अधिकजणांचा जमाव या भंगारविक्रेत्याच्या घरावर चाल करून आला. या प्रकरणी २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. ( was attacked by a mob at dapoli in ratnagiri) गंगासागर दिवाकर शुक्ला असे या परप्रांतीय भंगारविक्रेत्याचे नाव आहे. शुक्ला यांनी देगाव गावात केली आहे. या परप्रांतीयाला जमीन विक्री केली म्हणून काहींचा आक्षेप आहे. हा वाद या परिसरात काही दिवस सुरू आहे. याच वादातून हा सगळा धक्कादायक प्रकार शनिवारी घडल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या परिसरात आता चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून जलद कृती दलाचे एकूण ३२ पोलीस कर्मचारी गावात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. गाव परिसरात आता परिस्थिती नियंत्रणाखाली असून शांतता आहे. क्लिक करा आणि वाचा- या घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकरण काशीद, प्रभारी निरीक्षक अहिवले, सहाय्यक निरीक्षक निनाद कांबळे, सहाय्यक शीतल पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली व सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान ज्या एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील बरेचजण गावात नसून त्यांना लवकरच अटक करून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दापोली पोलिसांनी दिली. जमाव घरावर चाल करून आल्यानंतर त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत एकाच्या माडीवर जाऊन लपला. पण त्यांच्या घरात शिरकाव करत जमावाने मंडपे नामक व्यक्तीला मारहाण केली. सैराट झालेल्या या जमावाने घरातील अन्न धान्य आणि वस्तूंची नासधूस केली. येथील बौद्धवाडी येथे रहाणारे भंगारविक्रेते गंगाराम शुक्ला यांना वीस नागरिकांच्या जमावाने मारहाण करून घरातील सामानाची नासधूस केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा- याप्रसंगी शुक्ला यांचे वाड्यातील धान्य व इतर सामानाची नासधूस करून काही सामान शेजारील शेतात फेकून देत ते डिझेल टाकून देऊन पेटविण्यात आले. तर, बाहेर उभी असलेली टाटा एक्सल गाडीची काच फोडून ती उलटवून टाकण्यात आली. तसेच घर बांधणीसाठी आणलेल्या तीन पाण्याच्या टाक्या देखील फोडून टाकण्यात आल्या. शुक्ला हे या प्रकाराने भयभीत झाल्याने जीव वाचवण्याच्या उद्देशाने मुकुंद सिताराम मंडपे यांच्या माळ्यावर लपून बसले. हे या जमावाला समजल्यावर या जमावाने मंडपे यांच्या घरात शिरून त्यांनाही मारहाण केली. या सामूहिक हल्ल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गंगाराम शुक्ला (वय २७) यांनी तक्रार दिल्यानंतरखालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला- १. दिनेश तुकाराम म्हाकुलकर २. रविंद्र गोपाळ भोसले ३. प्रदीप राधु भोसले ४. माकांत मोहन शिंदे ५. गुरुनाथ रावजी मांडवकर ६. रविंद्र गोपाळ भोसले ७. रूपेश बामणे ८. विश्वास पांडुरंग पाथस्टकर ९. सुरेश रामचंद्र करूंजकर (स्थानिक अध्यक्ष) १०. विकास गंगाराम बाईत ११. प्रभाकर काशिराम गोलांबडे १२. गंगाराम लक्ष्मण बाईत १३. नागेश लक्ष्मण जाधव १४. दिलीप महादेव जाधव १५. अनंत शविराम जाधव १६. अनुराधा दत्ताराम भोसले १७. शानु पाथस्टकर १८. सुनिल देवजी शविगण १९. अशोक गंगाराम कदम २०. चंद्रकांत दगडु बामणे व अन्य क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LnFcbEU
No comments:
Post a Comment