Breaking

Saturday, April 9, 2022

करारा जवाब मिलेगा!; राज यांच्या निशाण्यावर आता 'हे' तीन नेते https://ift.tt/YdGuxW3

मुंबई: अध्यक्ष यांनी शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे हे मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी ठाणे येथे 'उत्तर'सभा घेत असून ही सभा वादळी ठरणार हे स्पष्ट झाले आहे. राज यांच्या या सभेचा टीझर आज झळकला असून त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ( ) वाचा : राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला जराही न दुखावता महाविकास आघाडीला लक्ष्य केले होते. त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज यांच्या निशाण्यावर होते. याच सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबतही राज यांनी आक्रमक भूमिका मांडली होती. 'मी धर्मांध नाही. कुणाच्याही प्रार्थनेला माझा विरोध नाही पण मशिदींवर लावलेले भोंगे उतरवावेच लागतील. हे भोंगे नाही उतरवले तर मशिदींसमोर दुप्पट क्षमतेच्या लाउडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा', असे राज म्हणाले होते. राज यांच्या या भाषणावर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली असून राज्यातील वातावरणही चांगलंच तापलं आहे. वाचा : ' हे अचानक भोंगे बंद करायची भाषा करायला लागले. इतके दिवस काय झोपा काढल्या होत्या का?', असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री यांनी राज यांना विचारला आहे तर गुढीपाडव्याला शीवतीर्थावर जो भोंगा वाजला तो भाजपचा होता, असा टोला शिवसेना नेते यांनी हाणला आहे. ज्येष्ठ नेते यांनीही राज यांची खिल्ली उडवलीय. 'राज ठाकरे तीन चार महिन्यांनंतर अचानक प्रकटतात. एखादं व्याख्यान देतात आणि परत भूमिगत होतात. या मधल्या काळात ते काय करतात माहीत नाही', असा चिमटा पवार यांनी घेतला होता. याच टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात सभा घेत असून आज झळकलेला टीझर पाहता राज यांच्या निशाण्यावर हे तीन नेते तर असणारच हे स्पष्ट झाले आहे. बौखला गये हैं वो,खलबली मच गई हैं,बदहवासी छाई हैंमगर,आसमान में थूकने वाले को शायद यह पता नहीं है, की पलट कर थूक उन्हीं के चेहरे पर गिरेगी...करारा जवाब मिलेगा! असा हिंदी व्हिवो या टीझरला देण्यात आला आहे. त्याचेही बरेच अर्थ काढले जात आहेत. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DY7BZsI

No comments:

Post a Comment