Breaking

Friday, April 15, 2022

गोरखपूर मंदिर हल्ला: मुर्तजाचे तपासादरम्यान धक्कादायक कृत्य https://ift.tt/iEnrYcI

गोरखपूर: गोरखपूर येथील हल्ल्यातील मुख्य आरोपी याने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि त्याची चौकशी करणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांवरही हल्ला केल्याचे उघड झाले आहे. मुर्तजाच्या चौकशीतून आणखी पाच लोकांची नावे पुढे आली असून, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे; तसेच त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत ( ) कलमे लावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. ( ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री प्रमुख असलेल्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुर्तजाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळविलेला मुर्तजा पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास सातत्याने नकार देत आहे. शुक्रवारी चौकशी सुरू असताना मुर्तजाने एका निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला बोचकारले. यामुळे या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत; तसेच प्लास्टर बांधलेल्या हाताने त्याने एका पोलीस कॉन्स्टेबललाही धक्काबुक्की केली. काही दिवसांपूर्वी त्याने एका डॉक्टरबरोबरही झटापट केली होती. तपास जाणार एनआयएकडे मुर्तजावर ‘युएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. ‘विदेशात बसलेल्या काही नेत्यांनी बॉम्बऐवजी धारदार शस्त्रांनी गोरखनाथ मंदिरावर हल्ला करण्याची सूचना मला केली होती,’ असे मुर्तजाने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले होते. हल्ला करण्यापूर्वी आपल्या लॅपटॉप आणि मोबाइलमधून काही महत्त्वाची माहितीसुद्धा डिलीट केल्याचे त्याने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vtgcJ5A

No comments:

Post a Comment