Breaking

Friday, April 15, 2022

गुणरत्न सदावर्तेच्या अडचणी अधिकच वाढल्या; आता कोल्हापुरातही गुन्हा दाखल https://ift.tt/qkQh8rL

कोल्हापूर: प्रश्नावर टीका करताना मराठा आणि मागास जातीबाबत चुकीचे वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अ‍ॅड. (Ad. Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मराठा समाज समन्वय समितीचे कार्यकर्ते दिलीप मधुकर पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सदावर्ते यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (a case has also been registered against adv in kolhapur) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावरील हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सातारा पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केली आहे कोर्टाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी आहे. दरम्यान कोल्हापूरातही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सातारा येथील गुन्ह्यात त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेण्याची शक्यता आहे .त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, आज सातारा कोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांनी साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केली होती. या प्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक मुंबईतील घरासमोर आंदोलन झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ही कारवाई झाल्यानंतर काल सातारा पोलिसांनी सदावर्तेंना आपल्या ताब्यात घेतले. काल त्यांना साताऱ्यात आणल्यानंतर त्यांना सकाळी ११ वाजता कोर्टात हजर करण्यात आले. तेथे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aok7U8v

No comments:

Post a Comment