मुंबई : दादर-माटुंगा स्थानकादरम्यान (Matunga Railway Station) चालुक्य एक्स्प्रेसचे (dadar-puducherry chalukya express ) डबे घसरून अपघात झाला. दादर-पुद्दुचेरी चालुक्य एक्सप्रेसचे मागील तीन डब्बे शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घसरले. एकाच रेल्वे मार्गावर दोन्ही रेल्वे गाड्या आल्याने गदग एक्स्प्रेसने चालुक्य एक्सप्रेसला धडक दिली. सिग्नल ओलांडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. () छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गदग एक्स्प्रेस ही गाडी नियमित वेळापत्रकानुसार साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी येथून निघाली. याच वेळेस दादर ते पुद्दुचेरी चालुक्य एक्स्प्रेस दादर फलाट क्रमांक सात वरून रवाना झाली. या दोन्ही गाड्या जलद मार्गावरून आपल्या गंतव्य स्थानकांसाठी रवाना होणार होत्या. दादर-माटुंगा स्थानकादरम्यान गदग एक्स्प्रेसने चालुक्य एक्स्प्रेसच्या मागच्या तीन डब्यांना धडक दिल्याने चालुक्य एक्स्प्रेसचे डब्बे घसरले. या दोन्ही गाड्यामध्ये प्रवासी होते, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. दादर-पुद्दुचेरी चालुक्य एक्स्प्रेसचे तीन डबे घसरून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळलेली नाही, घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून घसरलेले डबे बाजूला करत वाहतूक सुरू करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. माटुंगा रेल्वे स्टेशनजवळील अपघातान मुंबईबाहेर जाणाऱ्या सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांवर याचा परिणाम होणार असून लोकल सेवेवरही परिणाम होणार आहे. तसंच अपघातामुळे जलद अप आणि डाऊन रेल्वे सेवा देखील बंद आहे. फास्ट ट्रॅकवरील सर्व लोकल स्लो ट्रॅकवर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्लो ट्रॅकवर मोठा भार आला असून सर्व रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sL0AuvX
No comments:
Post a Comment