Breaking

Saturday, April 30, 2022

योगी सरकारचा दणका; ४६ हजार भोंगे हटवले, राज ठाकरे बोलल्यानंतर... https://ift.tt/K8chovR

लखनऊ: सरकारने धार्मिक स्थळांवर विनापरवाना लावण्यात आलेल्या लाउडस्पीकर्सविरोधात मोहीम हाती घेतली असून गेल्या पाच दिवसांत सुमारे ४६ हजार हटवण्यात आले आहेत. त्याचवेळी परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या लाउडस्पीकर्सद्वारे ध्वनी प्रदूषण होणार नाही, यादृष्टीने संबंधितांना आवाज कमी करण्यास सांगण्यात आले आहे. अशा साधारण ५९ हजार लाउडस्पीकर्सचा आवाज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला अनुसरून कमी केला गेला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ( ) वाचा : मनसे अध्यक्ष यांनी महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. त्यानंतर अन्य काही राज्यांतही तशी मागणी होऊ लागली आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाकडे बोट दाखवत धार्मिक स्थळांवर लावण्यात येणाऱ्या लाउडस्पीकरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील यांच्या सरकारने उचललेले पाऊल देशाचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. धार्मिक स्थळांवर विनापरवाना लावण्यात आलेले लाउडस्पीकर हटवण्यात यावेत आणि जिथे परवानगी घेण्यात आलेली आहे तिथे आवाजाची मर्यादा निश्चित करून द्यावी, असे आदेश योगी सरकारने दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर मोहीम राबवण्यात येत आहे. वाचा : उत्तर प्रदेशचे अवर मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली. २५ एप्रिल रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत धार्मिक स्थळांवर विनापरवाना लावण्यात आलेले ४५ हजार ७३३ लाउडस्पीकर हटवण्यात आले आहेत तर ५८ हजार ८६१ लाउडस्पीकर्सचा आवाज कमी केला गेला आहे. ही कारवाई अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे, असे अवस्थी यांनी सांगितले. या मोहिमेबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आजपर्यंतचा अहवाल घेण्यात आला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले. लाउडस्पीकरच्या माध्यमातून होणारं ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याला अनुसरूनच ही कारवाई केली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. वाचा : दरम्यान, उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकर्स हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी योगी सरकारचे जाहीर अभिनंदन केले होते. अशी कारवाई करण्याची सद्बुद्धी महाराष्ट्र सरकारला मिळो, अशी प्रार्थनाही राज यांनी केली होती. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी, असा टोलाही त्यांनी यांच्या सरकारला हाणला होता. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LsZV3wq

No comments:

Post a Comment