Breaking

Sunday, April 17, 2022

हनुमान मंदिरामागे सुरू होता आयपीएलवर सट्टा, पोलिसांना कळाले अन्… https://ift.tt/QAJO4ns

अहमदनगर: नगर शहरातील सावेडी उपनगरात सूर्यनगर येथील हनुमान मंदिरामागील मोकळ्या मैदानात क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर लावला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. ज्याच्या सांगण्यावरून हा जुगार सुरू होता, त्याचा शोध सुरू आहे. ( on behind in ) सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रत्यक्ष येऊ न शकणाऱ्यांसाठी आणि पोलिसांची नजर चुकविण्यासाठी मोबाईलवरून बुकिंग घेतले जात आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा घटनांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना नगर शहरात सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती मिळाली. सावेडी उपनगरात सूर्यनगर परिसरात हनुमानाचे मंदिर आहे. त्यामागील मोकळ्या मैदानात हा जुगार खेळला जात असल्याची माहिती कटके यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला तेथे जाऊन कारवाई करण्यास सांगितले. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी तेथून चेतन पांडुरंग वराडे (वय ४१, रा. सुर्यनगर, ) याला ताब्यात घेतले. तो प्रवीण गिते (रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर) याच्या सांगण्यावरून हे बुकिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सन रायझर्स हैद्राबाद या सामन्यावर ते सट्टा लावत होते. वराडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. आता गिते याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस अंमलदार संदिप पवार यांचे फिर्यादीवरुन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- स्थानिक गुन्हे शाखेतील सोपान गोरे, अण्णा पवार, पोना शंकर चौधरी, पोना सचिन आडबल, लक्ष्मण खोकले यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/E4QRSm8

No comments:

Post a Comment