कॅरोलिना: कोणाचं नशीब कधी बदलेल हे काही सांगता येत नाही. असंच काहीसं या पतीसोबत झालं आहे. या पतीने फक्त १६० रुपये खर्च करुन तब्बल ८ कोटी रुपये जिंकले आहेत. त्याच्या आयुष्यात हा दिवस त्याच्या बायकोमुळे आला. करोडपती होण्यात त्यांच्या बायकोचा महत्त्वाचा वाटा आहे. बायकोमुळे त्याचे आयुष्य बदलले असे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. हे पैसे जिंकल्यानंतर आता ती व्यक्ती निवृत्ती घेणार आहे. अमेरिकेतील कॅरोलिना येथील एका व्यक्तीने ८ कोटी रुपये जिंकले आहेत. द मिररच्या वृत्तानुसार, ६५ वर्षीय टेरी पीस यांनी फक्त १६० रुपयांना लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते. मात्र, घरी आल्यानंतर तो विसरला की त्याने ते कुठे ठेवले. त्याला असं वाटलं की त्याने तिकीट कुठेतरी हरवले. मग त्याने आपल्या बायकोला हे तिकीट शोधण्यास सांगितलं.हेही वाचा -मग त्याच्या पत्नीने तिची पर्स तपासली असता तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, तिचा पती जे तिकीट शोधत होता ते तिच्याच पर्समध्ये ठेवलेलं होतं. मात्र याबद्दल तिला काहीही कल्पना नव्हती. कारण, पर्समध्ये तिकीट ठेवल्यानंतर टेरी विसरला होता आणि त्याने त्याच्या पत्नीलाही ते सांगितलं नव्हतं. तिकीट मीळाल्यानंतर त्यांनी ते तपासलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, तो लॉटरी जिंकला होता. तीही काही लाखांची नाही तर तब्बल ८ कोटींची.हेही वाचा -मी अत्यंत भाग्यवान आहे कारण आता माझं आयुष्य बदलणार आहे. माझं नशीब चांगलं होतं म्हणून माझ्या पत्नीला ते तिकीट सापडलं. मला माझ्या नशीबावर विश्वास बसत नाहीये, असं टेरीने सांगितलं. टेरीला कर कपात करुन ५ कोटी ७८ लाख रुपये मिळाले. आता ते निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. तसेच, त्यांना ट्रक देखील खरेदी करायचा आहे.हेही वाचा -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uV7fxPl
No comments:
Post a Comment