Breaking

Monday, April 25, 2022

एलआयसीच्या आयपीओबाबत खूप मोठी बातमी; आता 'या' तारखेला... https://ift.tt/RDpuixC

नवी दिल्ली: एलआयसीच्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना याबाबत मोठी बातमी हाती आली आहे. हा ४ मे रोजी ओपन होईल आणि ९ मे पर्यंत गुंतणूक करता येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. उद्या होण्याची शक्यता असून या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही सूत्रांनी पुढे नमूद केले. ( ) वाचा : ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’ची ( ) पाच टक्के हिस्साविक्री करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्राथमिक भागविक्रीसाठी ( आयपीओ ) १३ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. मात्र, आता प्रत्यक्षात ३.५ टक्के हिस्साविक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘आयपीओ’मधून भांडवल उभारणीचे लक्ष्य घटून २१ हजार कोटी रुपयांचे झाले आहे. ही भांडवल उभारणी करण्यासाठी ‘एलआयसी’ सुमारे २२ हजार कोटी समभाग विक्रीला आणणार आहे. केंद्र सरकारने सुधारित ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ अर्थात ‘आयपीओ’चा अर्ज सेबीकडे नव्याने दाखल केला असता त्यास सेबीकडून मंजुरी मिळाल्याचे वृत्त सीएनबीसी टीव्ही १८ या वृत्तवाहिनीने दिले आहे. सुधारित ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’मुळे ‘एलआयसी’चे मूल्य सहा लाख कोटी रुपये होऊ शकेल. याआधी सरकारने ‘एलआयसी’चे मूल्य १७ लाख कोटी रुपये असेल, असे म्हटले होते. वाचा : ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’द्वारे भांडवल उभारणीचे, अर्थात हिस्साविक्रीचे लक्ष्य सरकारने घटवले असले तरीही हा आजवरचा सर्वांत मोठा ‘आयपीओ’ ठरणार आहे. हा बहुप्रतीक्षित ‘आयपीओ’ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ मे रोजी येण्याची शक्यता आता वाढली असल्याचे वृत्त आता हाती आले आहे. त्यामुळे या लवकरच संपणार हे स्पष्ट झाले आहे. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jIJmCsW

No comments:

Post a Comment