Breaking

Tuesday, April 26, 2022

'राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणारच; पुण्यातून नेऊ १०० ते १५० गाड्यांचा ताफा' https://ift.tt/SZR386u

पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या भोंग्याच्या विषयात आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते यांच्या येथील सभेकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे १ मे ला जाहीर सभा होणार आहे. या सभेला परवानगी मिळणार की नाही याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यावर मनसेचे राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (a convoy of 100 to 150 cars will leave from for 's meeting in aurangabad) या सभेला राज्य सरकार परवानगी देईलच आणि नाही दिली तरी आपण न्यायालयातून परवानगी आणू. पण सरकारच परवानगी देईलच. औरंगाबाद येथील सभेसाठी पुण्यातून राज ठाकरे यांचा ताफा औरंगाबादला जाणार असून त्यांच्यासोबत जवळपास १०० ते १५० गाड्यांचा असणारा ताफा असणार आहे, अशी माहिती बापू वागस्कर यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- राज ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात आज पुण्यात माध्यमांशी बाबू वागस्कर यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मनसेच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आठवड्याच्या कामाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. येत्या अक्षय तृतीयेला राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेकडून सर्व मंदिराममध्ये आरती करण्यात येणार आहे. अशा सूचना सर्व शाखा अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती वागस्कर यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- तसेच आयोध्या दौऱ्यासाठी राज्यातून आम्ही १२ रेल्वेची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. आता ते किती ट्रेन देतात हे पाहावे लागेल. आम्ही अयोध्या दौऱ्यात रीतसर तिकीट काढून जाणार असून राज्यातून ४० हजाराहून अधिक नागरिक येणार आहेत. फक्त मनसैनिकच या अयोध्या दौऱ्यासाठी येणार नसून सर्व हिंदूत्व वादी संघटनांना आम्ही या दौऱ्यासाठी येण्याचे आवाहन करणार असल्याचे वागस्कर यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/h2ZPb3R

No comments:

Post a Comment