Breaking

Monday, April 4, 2022

योगींचं गोरक्षपीठ दहशतीखाली; असं आहे हल्लेखोराचं मुंबई कनेक्शन https://ift.tt/yD8mQwx

लखनऊ: येथील गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर हल्ला करणाऱ्या या तरुणाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अहमद मुर्तजा हा उच्चशिक्षित आहे. त्याने येथून पदवी घेतली असून रिलायन्स आणि एस्सार पेट्रोकेमिकल्स कंपनीत नोकरी केली आहे. गोरखपूर येथे घर असलं तरी तो मुंबईत वास्तव्याला होता. त्यामुळेच त्याअंगाने पोलीस कसून तपास करत आहेत. ( ) वाचा : मुख्यमंत्री हे गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर आहेत. त्यामुळेच परिसरात झालेल्या हल्ल्यामागील प्रत्येक शक्यता तपासण्यात येत आहे. या हल्ल्याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला असून हल्लेखोराचा कसून तपास करण्यात येत आहे. यात हल्लेखोर अहमद मुर्तजा अब्बासी याच्याबाबत आतापर्यंत जी माहिती हाती आली आहे त्याने पोलीसही चक्रावले आहेत. वाचा : अहमद मुर्तजा याचं गोरखपूरमधील सिव्हिल लाइन भागात घर आहे. २०१५ मध्ये त्याने आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर दोन मोठ्या कंपन्यांमध्ये त्याने नोकरी केली. २०१५ मध्ये सर्वप्रथम त्याला रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये जॉब मिळाला आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये काही काळ त्याने काम केले, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ' २०१७ पासून मुर्तजाचं मानसिक संतुलन बिघडलं. मुंबईत अनेक डॉक्टरांकडे त्याने उपचार घेतले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर त्याने मित्रांना भेटणेही कमी केले होते. त्यात लग्नाबाबत जो प्रकार घडला त्याने तो आणखी डिप्रेशनमध्ये गेला. एक लग्न ठरून मोडलं तर दुसरं स्थळ पक्क झालं, लग्नही झालं पण पत्नी सोडून गेली. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला ', असे मुर्तजाच्या घरच्यांचे म्हणणे आहे. यूट्युबवरील काही व्हिडिओ पाहून मुर्तजामध्ये कट्टरता भिनल्याचे पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात मुर्तजा पोलिसांवर हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C0xwscE

No comments:

Post a Comment