Breaking

Wednesday, April 27, 2022

करोनाच्या चौथ्या लाटेचा धोका; 'या' राज्याने घेतला खूप मोठा निर्णय https://ift.tt/yTHg4o7

थिरुवनंतपुरम: देशाच्या विविध भागांत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केरळमध्ये पुन्हा लागू करण्यात आली आहे. मास्कसक्तीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे , सोहळे , कार्यालये येथे मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, करोनाच्या नव्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. ( ) पंतप्रधान यांनी देशातील करोना स्थितीचा आढाव घेणारी एक बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केली होती. त्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलत होते. ‘सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक केलेला नाही. मास्क नसलेल्यांवर कारवाई होणार नाही. परंतु, नव्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले. वाचा : देशात २ हजार ९२७ नवे रुग्ण देशात २४ तासांत २ हजार ९२७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून, रुग्णसंख्या ४ कोटी ३० लाख ६५ हजार ४९६ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून १६ हजार २७९ वर पोहोचल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ५ लाख २३ हजार ६५४ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ६४३ने वाढली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७५ टक्क्यांवर असल्याचे सांगण्यात आले. रुग्ण बाधित होण्याचा दर ०.५८ टक्के तर आठवड्याचा दर ०.५९ टक्के नोंदविण्यात आला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/El6HQpy

No comments:

Post a Comment