Breaking

Thursday, April 7, 2022

करोनाच्या एक्स-ई विषाणूची लक्षणे किती गंभीर?; तज्ज्ञांनी दिली सविस्तर माहिती https://ift.tt/zKQ3qrG

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना संसर्गाचा फैलाव करणाऱ्या 'एक्स-ई' प्रकारच्या विषाणूच्या नव्या स्वरूपामुळे धास्तावून जाण्याची गरज नाही, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. या विषाणूची संसर्गक्षमता अधिक असली तरी त्याची लक्षणे तीव्र स्वरूपाची नसून, करोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारी घेतल्यास या प्रकारच्या करोना विषाणूच्या संसर्गालाही अटकाव करता येईल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक्स-ई विषाणूबाबत सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. व्ही. एस. मोंडे म्हणाले, 'यापूर्वी भारतातील तिसऱ्या लाटेदरम्यान बीए-१ आणि बीए-२ अशा ओमायक्रॉन विषाणूंचे अस्तित्व आढळून आले होते. सुरुवातीला बीए-१चे प्रमाण अधिक होते, ते नंतर कमी होत गेले. बीए-२ विषाणू ९० ते ९५ टक्के बाधितांमध्ये आढळून आला. या लाटेमध्ये शेकडो रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे होती. त्यामुळे ७५ टक्के व्यक्तींनी आजार होऊनही तपासण्या न करताच त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली.' 'बीए १ आणि बीए २ या दोन्ही विषाणूंमध्ये जनुकीय एकत्रीकरण होऊन ओमायक्रॉन विषाणूचे नवीन स्वरूप तयार झाले असावे, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याकडे जर बीए १ आणि बीए २ याविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल, तर आपल्याला 'एक्स-ई'ची भीती बाळगायला नको. दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमध्ये लसीकरणानंतर तीव्र स्वरूपाचा आजार अनेकांना झाला नाही. 'एक्स-ई'ची संसर्गक्षमता अधिक आहे; पण त्याची तीव्रता अतिशय कमी असल्याने धास्ती बाळगू नये', असे सूक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ डॉ. माधव साठे यांनी सांगितले. मुंबईत चाचणी शक्य नाही पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स-ईचे निदान करण्यासाठी जनुकीय चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटना, एनआयव्ही तसेच आयसीएमआरकडून या नव्या प्रकारच्या विषाणूचे जनुकीय कोड उपलब्ध झाले तर त्याचा शोध घेणे शक्य आहे. जानेवारीमध्ये प्रथम लंडनमध्ये आढळला. मात्र एप्रिलपर्यंत जगभरात सहाशे रुग्णांमध्ये तो आढळला. संसर्गक्षमता अधिक असती, तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते १५ लाख रुग्णसंख्येची नोंद व्हायला हवी होती. नायर व कस्तुरबा रुग्णालयांमधील प्रयोगशाळांमध्ये दोनशे ते अडीचशे नमुने असल्यास चाचण्या करणे शक्य आहे. मात्र सध्या करोनाची रुग्णसंख्या तितकी नसल्याने या चाचण्या कशा करणार असा प्रश्न आहे. बूस्टरकडे पाठ नको लस न घेतलेल्या व्यक्ती या संसर्गामध्ये बाधित होऊ शकतात. अजूनही भारतात सुमारे पाच ते सहा कोटी लोकांनी लस घेतलेली नाही. असे लोक या संसर्गाचे वाहक ठरू शकतात, अशी शक्यताही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/N7gQRoB

No comments:

Post a Comment