Breaking

Sunday, May 15, 2022

केतळी चितळेच्या अडचणींत अधिक वाढ; आता उस्मानाबादेतही गुन्हा दाखल https://ift.tt/4OZsFkP

: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सध्या पोलिस कोठडीत असलेली अभिनेत्री (Ketaki Chitale) हिच्याभोवती अडचणींचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. अभिनेत्री चितळे हिच्या विरोधात आज उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार () यांच्यावर अत्यंत खालच्या स्तराला जाऊन अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मिडियावर कविता पोस्ट केली होती. या नंतर केतकी चितळेच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. चितळे हिच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (A case has also been registered against actress in ) केतकी चितळेच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात रोहित बागल यांनी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनंतर केतकी चितळेच्या विरोधात भादवी १८६० कलम ५०५(२) ५००, ५०१, १५३-अ या द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी केतकी चितळेला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा- अकोल्यातही झाला गुन्हा दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षपार्ह शब्दात टीका केल्याप्रकरणी केतकीवर अकोल्यातही गुन्हा दाखल झाला आहे. अकोल्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांनी खदान पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर केतकीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- केतकी चितळेवर १० ठिकाणी गुन्हे दाखल केतकी चितळे हिच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले जात असून तिच्या विरोधात आतापर्यंत एकूण १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळेवर खालील ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. > खदान पोलीस ठाणे, अकोला > पवई पोलीस ठाणे, मुंबई > गोरेगाव पोलीस ठाणे, मुंबई > गाडगे नगर पोलीस ठाणे, अमरावती > नाशिक सायबर पोलिस ठाणे > कळवा > पुणे > पिंपरी-चिंचवड > धुळे > सिंधुदुर्ग क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pYqLUdk

No comments:

Post a Comment