मुंबई : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने हैदराबादच्या सामन्यात कमालच केली. दिल्लीच्या संघाने यावेळी फक्त हैदराबादवर विजय मिळवला नाही, तर दिल्लीच्या संघाने यावेळी तीन संघांना धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद ९२ आणि रोवमन पॉवेलच्या नाबाद ६७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने हैदराबादच्या संघापुढे २०८ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादच्या संघाला करता आला नाही. त्यामुळे दिल्लीच्या संघाने हैदराबादवर २१ धावांनी विजय साकारला आणि दोन संघांना धक्के दिले. दिल्लीच्या संघाने कोणत्या तीन संघांना मोठे धक्के दिले, पाहा...या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने ९ सामने खेळले होते. या ९ सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने ४ विजय मिळवले होते, तर त्यांना पाच लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आठ गुणांसह दिल्लीचा संघ हा सातव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर दिल्लीच्या संघाचे नशिबच पालटल्याचे पाहायला मिळाले. कारण या विजयानंतर दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत दोन संघांना जोरदार धक्के दिले. कारण हैदराबादच्या विजयानंतर दिल्लीच्या संघाने दोन गुणांची कमाई केली. या दोन गुणांसह दिल्लीच्या संघाचे एकूण १० पॉइंट्स झाले, पण त्याचबरोबर रनरेटही दिल्लीचा चांगला होता. दिल्लीने विजय साकारल्यावर त्यांच्यासह हैदराबाद आणि पंजाब यांचेही दहा गुण आहेत. पण दिल्लीच्या संघाने १० गुणांसह रनरेटच्या जोरावर दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघांना धक्का दिला आहे. कारण या विजयानंतर दिल्लीचा संघ हा सातवरुन पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे या विजयासह दिल्लीने प्ले ऑफच्या दिशेने मोठी मजल मारली आहे. हैदराबादचा कसा झाला पराभव, पाहा... दिल्लीच्या संघाने हैदराबादपुढे २०८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सुरुवातीच्या संघाला दोन धक्के बसले होते. त्यानंतर एडन मार्करम (४२) आणि निकोलस पुरनने (६२) अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान कायम ठेवले होते. पण या दोघांना चांगली साथ मिळाली नाही आणि हैदराबादच्या संघाला पराबव पत्करावा लागला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mNrCUax
No comments:
Post a Comment