Breaking

Wednesday, May 4, 2022

आयर्विन पुलावर दोन गाड्यांची जोरदार टक्कर; या भीषण अपघातात २ ठार, तर ८ जण गंभीर जखमी https://ift.tt/oicpsQh

सांगली: सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर दोन गाड्यांच्या भीषण झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव छोटा टेम्पो आणि चारचाकी वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- शहरातील आयर्विन पुलावर रात्रीच्या साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकासह एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर छोटा टेम्पो आणि चार चाकी वाहन यातील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुंग येथून एक भजनी मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ येथे भजन कार्यक्रमासाठी छोट्या टेम्पोमधून निघाले होते. तर संगली शहरातून कसबेडिग्रजकडे चार चाकी निघाली होती. भरधाव असणाऱ्या दोन्ही गाड्या कृष्णा नदीवरील असणाऱ्या आयर्विन पुलावर येताच समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला आहे. क्लिक करा आणि वाचा- हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. तर चारचाकी वाहनातील सुरक्षाकवच असणारे बलून देखील फुटले आहेत. अपघातात जखमीपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालया समोर मिळताच जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. शहर पोलीस ठाणे मध्ये नोंद झाली आहे. तर रात्री उशिरापर्यंत मृत आणि जखमींची ओळख पाटवण्याचे काम सुरू होते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uFTyi0n

No comments:

Post a Comment