: औरंगाबाद जिल्हयासह राज्यभरातील पंप चालकांनी ३१ मेपासून 'पेट्रोल-डिझेल नो परचेस' आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे आज ३१ मे पासून पंप चालक ऑईल कंपनीकडून इंधन खरेदी करणार नाहीत. या आंदोलनाच्या घोषणेनंतर वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचा पुरवठा नियमित नसल्याने, सोमवारी अनेक पंप बंद होती. यामुळे सोमवारी (३० मे) रात्री क्रांतीचौक सह इतर पंपावर पेट्रोल भरणाऱ्या लागलेल्या होत्या. (large at in ) पेट्रोल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी केला जात असल्याने त्याचा फटका अनेक पंपांना बसण्यास सुरुवात झाली. आपल्याला पेट्रोल मिळावे यासाठी अनेक पेट्रोलपंपांना बुकिंग करून ठेवावे लागत होते. अशा बुकिंग करून ठेवलेल्या पंप चालकांना शनिवारी पेट्रोल मिळाले. त्यानंतर अचानक पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याची घोषणा सरकारने केली आणि पंपचालकांपुढे मोठी समस्या उभी राहिली. याचे कारण म्हणजे तुटवड्याच्या काळात या पेट्रोलपंपांनी हजारो लिटर पेट्रोल आणि महागात खरेदी केले होते. याचाच मोठा फटका पेट्रोलपंपांना बसला. क्लिक करा आणि वाचा- केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क घटविण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. पेट्रोलवर आठ रुपये घटविण्यात आले असून डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी करण्यात आले आहे. केंद्र शासनाने हे दर कमी केल्यामुळे रविवारी शहरात पेट्रोल ११३ रूपये प्रति लिटर दराने विकण्यात येत आहे तर डिझेलचे दर ९८ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या निर्णयाचा दिलासा हा सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. मात्र याचा भुर्दंड हा पेट्रोल पंप चालकांना मोठा बसलेला आहे. क्लिक करा आणि वाचा- एकाच दिवसात झाले ५ लाखांचे नुकसान पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी आणि अनियमित झाल्यानंतर औरंगाबादमधील पेट्रोलपंप चालकांनी बुकिंग करून इंधन खरेदी केले. मात्र हे इंधन त्यांनी चढ्या भावाने खरेदी केले. या दरम्यान शहरातील एका पेट्रोल पंपावर २४ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल पाठविण्यात आले. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केल्यानंतर एकाच दिवसात या पेट्रोल चालकाला साधारणत: पाच लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले. ही परिस्थिती अनेक पेट्रोलपंपधारकांचीही आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9hP3wEY
No comments:
Post a Comment