Breaking

Friday, May 27, 2022

जोस बटलर राजस्थानसाठी ठरला हुकमी एक्का, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम https://ift.tt/a0YEn8g

अहमदाबाद : जोस बटलरने या सामन्यातही तुफानी खेळी साकारत शतक झळकावले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बटलरचे हे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये चार शतके झळकावता आली नव्हती. बटलरने या सामन्यात ६० चेंडूंत १०६ धावांची खेळी साकारली. राजस्थानकडून या हंगामात खेळताना ८१७ धावा केल्या आहेत आणि या हंगामातील सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे त्याच्या नावावरच यावेळी ऑरेंज कॅप असेल,यात शंका नाही. बटलरने या सामन्यात षटकारासह आपल्या ८०० धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये आठपेक्षा जास्त धावा करणार तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांनी एका हंगामात ८००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या यादीमध्ये आता बटलरचा समावेश झाला आहे. राजस्थानकडून एकाही फलंदाजाला आतापर्यंत अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने आत्तापर्यंत ८० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २६२ चौकार तर १२९ षटकार लगावाले आहेत. विशेष बाब म्हणजे या हंगामाला सुरूवात झाली तेव्हापासून आँरेंज कॅप त्याच्याजवळचं आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या यादीत त्याने विराट कोहलीशी बरोबरी केली आहे. २०१६ साली कोहलीने चार शतके झळकावली होती. बटलरने यावर्षी आतापर्यंत चार शतकं पूर्ण केली असून त्याने कोहलीशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत जर बटलरने शतक साकारले तर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा मान त्याला मिळू शकतो. राजस्थानकडून सर्वाधिक पाच शतकं आता बटलरच्या नावावर आहेत, यापूर्वी अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी दोन शतकं झळकावली होती. बटलरने या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि केकेआरबरोबर शतके झळकावली आहेत. त्यामुळे आता आयपीएलच्या अंतिम सामन्यात जेतेपद कोण पटकावतं याबरोबरच बटलर शतक करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे ऑरेंज कॅपबरोबर बटलर अजून कोणते पुरस्कार पटकावतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/U0n5WOX

No comments:

Post a Comment