Breaking

Tuesday, May 31, 2022

आयपीएलमध्ये यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, मोहम्मद शमीच्या नावावर अनोखा विक्रम https://ift.tt/B5U9lK1

अहमदाबाद : गुजरातच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले. गुजरातने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात दमदार कामगिरी केली. पण गुजरातचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद नावावर एक असा विक्रम जमा झाला आहे की, यापूर्वी आयपीएलमध्ये असं कधीच घडलेलं पाहायला मिळालं नव्हतं. मोहम्मद शमीच्या नावावर कोणता अनोखा विक्रम जमा झाला आहे, पाहा...मोहम्मद शमी हा गुजरातसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने या हंगामात गुजरातकडून १६ सामने खेळले आणि त्यामध्ये त्याने २० विकेट्स मिळवल्या. शमी हा पहिल्या पॉवर प्लेमध्ये अचूक आणि भेदक मारा करायचा. शमीचा पहिला स्पेल हा भन्नाट असायचा, आपल्या पहिल्या स्पलेमध्ये शमीने गुजरातला बहुतेक वेळा विकेट्स मिळवून दिल्या होत्या. त्यामुळे शमीचा पहिला स्पेल प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू सांभाळून खेळत होते. पण शमीच्या नावावर आता या आयपीएलमध्ये असा विक्रम नोंदवला गेला आहे की, आतापर्यंत कोणत्याच खेळाडूवर अशी वेळ आली नव्हती. शमी हा गुजरातच्या संघासाठी १६ सामने खेळला. पण शमी या १६ सामन्यांमध्ये मैदानात फलंदाजीसाठी कधीच उतरला नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत अशी गोष्ट घडली नाही. आयापर्यंतच्या आयपीएलच्या सर्व हंगामांमध्ये अशी गोष्ट कधीच घडलेली नाही. आतापर्यंत सर्व खेळाडू कधी ना कधी तरी एका हंगामात फलंदाजीसाठी उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. पण गुजरातच्या संघाची फलंदाजी एवढी भक्कम होती की, शमीवर कधीच फलंदाजीला येण्याची वेळच भासली नाही. त्यामुळे या हंगामातील एकाही सामन्यात शमी कधीच फलंदाजी आला नाही. आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत सर्व सामने खेळून एकदाही फलंदाजीला न येणारा शमी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. पण शमीने गोलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी केली. शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर गुजरातचा संघ प्रतिस्पर्धी संघाला लवकरच पहिला धक्का देत होता. त्याचबरोबर त्यांची फलंदाजीची फळीही भक्कम होती, त्यामुळे शमीला यंदाच्या आयपीएलमध्ये एकदाही फलंदाजीला येण्याची वेळच आली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/g1koriN

No comments:

Post a Comment