Breaking

Wednesday, May 25, 2022

पाणी पिण्यासाठी घोडा कृष्णा नदीत उतरला, इतक्यात महाकाय मगर आली आणि... https://ift.tt/Brcn2hK

: कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या घोड्यावर मगरीने हल्ला चढवला आणि घोड्याला नदीपात्रात ओढून नेल्याची घटना घडली आहे. भिलवडी नजीकच्या चोपडेवाडी या ठिकाणी घटना घडली आहे. () पलूस तालुक्यातील चोपडेवाडी या ठिकाणी असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मगरीने एका घोड्याला ओढून नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे. गावातील उदय मोरे यांच्या घोडयाला त्यांचा मुलगा आर्यन हा नदीकाठी चरण्यासाठी घेऊन गेला होता, यावेळी चरत चरत घोडा पाणी पिण्यासाठी कृष्णा नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमी जवळ गेला.यावेळी पाणी पिण्यासाठी घोडा कृष्णा नदीच्या पात्रामध्ये उतरला. क्लिक करा आणि वाचा- त्याच वेळी पाण्यात असणाऱ्या मगरीने घोड्यावर हल्ला चढवला.आणि भल्या मोठया घोड्याला पात्राता ओढून नेले. त्यानंतर सुमारे तासभर घोड्याला जबड्यात धरून महाकाय नदीपात्रामध्ये फिरत होती.त्यानंतर घोडयाला नदीकाठी सोडून मगर गायब झाली.उशिरा पर्यंत घोड्याला पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. क्लिक करा आणि वाचा- कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा अधिवास आहे. याच परिसरात अनेक वेळा मगरींकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्या मध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक प्राण्यांच्यावरही मगरीचे अनेक वेळा हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता एका भल्यामोठ्या घोड्यावर हल्ला चढवून मगरीने ओढून नेऊन ठार केल्याच्या घटनेने कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pzYZq1C

No comments:

Post a Comment