मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं संस्थेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), या संस्थेला नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीची चर्चा सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेनं राज्यसभा निवडणुकीसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांचे अर्ज दाखल केले आहेत. तर, संभाजीराजे आग्रही असणाऱ्या सारथी संस्थेसाठी नवी मुंबईतील खारगरमध्ये जागा देण्याच्या ठाकरे सरकारच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरु झाली आहे. नियोजन विभागाकडून भूखंड देण्यात येणार राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर,अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र, जेष्ठ नागरीक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इ. सुविधा विकसीत करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी 500 मुलांचे व 500 मुलींचे स्वतंत्र निवासी वसतीगृह देखील विकसित करण्यात येईल. याअंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37, मधील 3500.00 चौ.मी.क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला करोना संसर्गापासून सुरक्षित राहावं म्हणून मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. आज राज्यात ५०० हून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा आणि टँकर्सद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात ४०१ टँकर्स सुरू असून तसेच धरणात ३७ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती देण्यात आली. तर, राज्यातील हरभरा उत्पादनात मोठी वाढ झाली असल्यानं. केंद्र सरकारला हरभरा खरेदी कालावधी २८ जूनपर्यंत वाढविण्याची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jrZlIY9
No comments:
Post a Comment